गाेंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्ययन केंद्र सुरु करा
आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन सादर
गडचिराेली 🟣🟢किरण घाटे🟡 रविवार दि .१४मार्चला नामदार अॅड. के सी. पाडवी आदिवासी विकास मंत्री यांचे नंदूरबार जिह्यातील असली येथील निवासस्थानी आदिवासी विकास संदर्भात गडचिराेलीच्या एका शिष्टमंडळा साेबत विस्तृत चर्चा करण्यात आली. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता विचारवंतांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर चिंतन बैठक घ्यावी लागणार असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले . माजी जि .प .सदस्य तथा सामाजिक विचारवंत कुसुमताई अलाम यांनी गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी अध्ययन केंद्र सुरु करण्या विषयी निवेदन दिले.चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यास सांस्कृतिक,ऐतिहासिक वारसा लाभला असुन. भौगोलिक परिस्थिती वनसंपदा, खनिज संपत्ती माेठ्या प्रमाणात आहे, आदिवासी परंपरा, जीवनमूल्ये, अस्मिता, याचा अभ्यास केला पाहिजे. असेही निवेदनात व चर्चेतून नमूद केले. रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात जाणारे मजुर मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांची नोंद ग्रामपंचायती मध्ये करण्यात यावी अशी मागणी देखिल या चर्चा दरम्यान केली असता, मजुरांची तथा बाहेर बदलून गेलेले, बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी करण्या संदर्भात जी .आर. काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.