राजनगट्टा येथील युवकाने घेतला पर्यवारण संवर्धनाचा ध्यास

0
717

राजनगट्टा येथील युवकाने घेतला पर्यवारण संवर्धनाचा ध्यास

उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सुरू केली पाणपोई

सुखसागर झाडे । पर्यावरण हा एक निसर्गचक्र आहे व या पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती, जीव जंतु हे सर्व या निसर्गचक्राचे घटक असून यातील एक जरी घटक नष्ट झाला तर निसर्गचक्राची साखळी विस्कळीत होते व पर्यावरणाचे संतुलन बिघडते. यास्तव पर्यावरनाचे समतोल राखण्याकरिता राजनगट्टा येथील सामाजीक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी पक्षाचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्या मुळे रानवनातील पाणवठे आठले त्यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी अनुप कोहळे यांनी गावात तसेच गावासभोवती एखादा झाड किंवा इतर ठिकाणी पिण्याचे पाणी ठेऊन पक्षी वाचवा – पर्यावरण वाचवा असा संदेश देत आहे.
अनुप कोहळे हे नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. लाकडाऊन च्या काळात गरजूंना अन्यधान्य वाटप केले. रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांकरिता अभ्यास सुरू उपक्रम राबवून गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे व कौशल्य विकासाचे ज्ञान दिले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे देखील काम केले. गावातील लोकांचे आरोग्य सुरळीत राहावीत म्हणुन कोरडा दिवस पाळून गावात नियमित ग्रामस्वच्छता राबविण्यात आले.
विविध जयंत्याचा माध्यमातून, संविधान दिन, राष्ट्रीय मतदार दिन,जागतिक एड्स दिन, बालक दिन, गांधी जयंती इत्यादी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला .
गावातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सैन्य भरती मध्ये जात यावे याकरिता सैन्य भरती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. सामान्य ज्ञान परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञावृद्धीचा मार्ग मोकळा करून दिला. लेखनाच्या व वक्तृत्वाच्या माध्यमातून ठीक ठिकाणी समाज प्रबोधनाचे कार्य केले.
आता उन्हाळा सुरू होताच त्यांनी पक्ष्यासाठी पाणपोई व कृत्रिम घरटे बनवण्याचा उपक्रम हाती घेतला. झाडावर बाटल टांगून ते नियमित पाणी टाकत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here