जागतिक महिला दिनी श्रुती उरणकरचे रक्तदान ! अनेकांनी केले श्रुतीचे अभिनंदन ! 🟣🟡मुंबई🟢किरण घाटे🟣 ठाकुर्लीच्या सुपरिचित समाज सेविका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या श्रुती सतीश उरणकर यांनी काल सोमवार दि. ८मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सकाळी स्वस्यंस्फुर्तिने रक्तदान करुन महिला दिन साजरा केला .विशेष उल्लेखनिय बाब अशी की श्रुती उरणकर यांना समाज सेवेची अमाप आवड असुन आज पावेताे श्रुतीचे सामाजिक कार्यात माेलाचे योगदान राहिले आहे . त्यांचे विशेष उल्लेखनिय कामगिरी बाबत या पुर्वि सुध्दा त्यांना अनेक सामाजिक संघटनेव्दारे पुरस्कार देवून गाैरविण्यांत आले आहे . तेजस इंटरप्राँयजेसच्या त्या मुख्य संचालिका असुन समाजातील विविध उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे .दरम्यान श्रुती उरणकर यांचे या अभिनव उपक्रमाचे सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , नागपूरच्या जेष्ठ लेखिका गीता बाेरडकर , चंद्रपूरच्या समाजसेविका मंथना नन्नावरे , सुविधा बांबाेडे , कु.क्रीड़ा खेळाडु सायली टाेपकर ,याेगा शिक्षिका श्रध्दा हिवरे , आयजेके कंपनीच्या प्रतिभा चट्टे , रसिका ढाेणे चंद्रपूरच्या पुनम रामटेके , दुर्गापूरच्या कविता चाफले , सुविधा चांदेकर , प्रतीक्षा झाडे , पुनम जांभुळे , नागपूरच्या प्रेरणा हुमने , धनश्री शेंडे , नेरीच्या ज्याेती मेहरकरे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभकामना दिल्या आहे .