ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिन थाटात साजरा !
चंद्रपूर🔶किरण घाटे🟡 भिक्खु निवास,पाली बुद्ध विहार, टेकडी, बल्लारपूर( चंद्रपूर) येथे काल साेमवार दि. ८मार्चला जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला हाेता .त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आठ पैकी सात भिक्खुनी व बाळांना जिवनदान देणारे पाच भंडारा सामान्य रुग्णालयातील सच्चे सैनिक उपस्थित होते.सदरहु समारंभात भिक्खुनी खेमा, बल्लारपूर.भिक्खुनी संघमित्रा,भिक्खुनी खेमा,भिक्खुनी संघपाला,भिक्खुनी उपलवन्ना,सामणेरी शिलरक्षिता,सामणेरी संबोधी यांचा प्रामुख्याने समावेश हाेता .त्यांनी उपासक उपासिका तसेच भिक्खुनींना धम्म संगीनी विषयावर चर्चा करुन माेलाचे मार्गदर्शन केले.या नंतर जिवनदान गौरव सत्कार कार्यक्रम पार पडला .अजित कुर्झेकर,मनोज चिलगर,बबन मानतुटे,जितेंद्र टाले,शिवम मडावी व गौरव रेहपाडे भंडारा सामान्य रुग्णालयात ज्यांनी जन्म झालेल्या लहान बाळांना वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अग्नी व धुरातुन बाहेर काढुन बाळांना जिवनदान कसे दिले याचे प्रत्यक्षदर्शी ,आलेला थरारारक अनुभव सांगताच उपस्थितितांच्या डोळ्यांत पाणी तरंगले.या वेळी जिवनदान करणा-या प्रत्यक्ष वीरांचे दर्शन झाले.अश्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजक व नियोजन चंद्रपूरच्या अल्काताई मोटघरे (अध्यक्ष ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर..)यांनी केले .समारंभाला प्रा.दुषंत नगराळे ,उमरेताई,पिपरे,सत्यभामा भाले , पाली बुद्ध विहार महिला संघ, उपासिका, अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल पाटील- कांबळे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार सुप्रियाताई चंदनखेडे यांनी मानले.