करंजीतील पशुधन संकटात
कुत्र्यांच्या चाव्याने महिण्याभरात दगावली १३ जनावरे
पशुधन विभागाच्या असहकार धोरणामुळे वाढली बळीराज्याची चिंता
गोंडपीपरि(सूरज माडूरवार)
तालुक्यातील करंजी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने महिण्याभरात १३ जनावरे मृत्यूमुखी पडली.यामुळे करंजीतील पशुधन संकटात सापडले असून गावकरी हैराण आहेत.असे असतांना पशुधन विभागाच्या असहकार धोरणामुळे बळीराज्याची चिंता वाढली आहे.यातच करंजी ग्रामपंचायतीत १६ फेब्रुवारीच्या पहिल्याच मासिक सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावातील कुत्र्यांना मारण्याचे फर्माण सोडले.मात्र अजूनही गावात या गंभिर प्रकाराची दहशत कायम आहे.जनावरे दगावने सुरुच असल्याने कोरोनाच्या पाश्वभुमिवर शेतकऱ्यांना आता पशुधनाची काळजी सतावत आहे.परिणामी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
उद्योगविरहीत गोंडपिपरी तालुक्यात नागरिकांचा उदरनिर्वाह शेती,शेतमजूरीसह वेळेवर मिळेल त्या कामावर होतो.अश्यातच शेतीचा हंगाम आटोपल्यावर रोजगाराच्या शोधात ईतरत्र भटकणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.यातच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने बाहेर गेलेले मंडळी लाॕकडाऊनच्या धास्तीने परतू लागली आहे.कोरोनामुळे जनसामान्याचे हाल होत असल्याचे चित्र आहे.यातच गोंडपिपरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने पशुधनही मोठे आहे.असे असतांना आता तालुक्यातील करंजी गावात या महिण्याभरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने १३ जनावरे दगावली.अनं आधिच कोरोनाच्या सावटात विवंचनेत दिवस काढत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.अनेकांचे बैल मेल्याने येत्या हंगामाचीच वाट लागली आहे.लागलीच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांनी चावा घेणाऱ्या कुत्र्यांना मारण्याचे फर्माण सोडत १२ कुत्र्यांला मारले.ही मोहिम सुरु आहे.मात्र गावात अजूनही कुत्र्यांची दहशत कायम आहे.यामुळे गावातील आबालवृद्धही भयभित आहेत.गावात कुत्र्यांच्या हैदोशाच्या पाश्वभुमिवर पशुसंवर्धन विभाग मात्र बघ्याची भुमिका घेत आहे.शेतकऱ्यांना या विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने जनावरांच्या उपचारांसाठी भटकावे लागत आहे.परिणामी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
—————————————-
१) करंजीतील हा प्रकार गंभिर आहे.ग्रामपंचायतीने यावर कडक पाऊले उचलावी.अश्या परिस्थितीत पशुपालकांना फारसा वेळ मिळत नाही.त्यामुळे प्रसंगी तात्काळ औषधोपचार करुन घ्यावा.उपचाराची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल.
– सुनिल उरकुडे,सभापती,कृषी व पशुसंवर्धन,जि.प.चंद्रपूर.
कुत्र्यांच्या चाव्याने गावातील पशुधन दगावण्याचा प्रकार गंभिर आहे.यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी
– समीर निमगडे,सदस्य,ग्रा.पं.करंजी.