दलितांवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबेना
चांभारड्यानी चांभारड्या सारखं राहावं, चपला शिवाव्यात म्हणत चांभार समाजाच्या सूरज कांबळे वर कुराडीने हल्ला करण्यात आला आहे!
बीड, तालुका केज, सावळेश्वर (पै) गावं : शेतीच्या बांधावरून महिश घेऊन जात असतांना कारे चांभारड्या माझ्या बांधावरून चालला म्हणत, चांभारड्यानी चांभारड्या सारखं राहावं, चपला शिवाव्यात आमच्या बांधावरून जाऊ नका म्हणत भांडण केलं. गावात पोरांना बोलवलं आणि कुराडीने सूरज कांबळेवर हल्ला केला डोक्यात 4 टाके पडलेत तर हाताच्या बोट तूटता तुटता राहिलं. एवढा भयानक हल्ला झालेला असतांना पोलीस यंत्रणेनी केवळ दवाखानात जाण्याचा सल्ला दिलाय.
आपल्या माहितीसत्व, हे तेच पोलीस स्टेशन आहे युसुफ वडगाव जिथे या दीड महिन्यातल्या अट्रोसिटी ऍक्टच्या दलित अत्याचाराच्या पाचपेक्ष्या जास्त घटना घडल्या आहेत. हे निंदनीय आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्या पीडितांवर खोट्या दरोडा, 307 सारख्या क्रॉस गंभीर केसेस केल्या आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुखजी मुंबईचे बिच बघून झाले असतील तर जरा महाराष्ट्रातील दलित अत्याचारावर बोला. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भूमिका घ्या. दलितांचे, वंचिताचे मुद्दे हाताळायला लाज वाटते का? असा प्रश्न ऑल इंडिया पँथर सेना ने उपस्थित केला आहे.
या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना ने जाहीर निषेध केला. या सरकारच्या काळात बौद्ध, मातंग, पारधी, चांभार कुणीही सुरक्षित नाहीत. सर्वच वंचित घटकांवर हे जातीय हल्ले सुरू आहेत. कोरोनाचा आढावा घेणारे कधी तर जातीय कोरोनाचा आढावा घेणार आहेत की नाही?तात्काळ आरोपींना अटक झालीच पाहिजे, पीडितांना संरक्षण मिळाले पाहिजे. युसुफ वडगाव पोलीस स्टेशन दलित अत्याचाराचा रेड झोन म्हणून घोषित केलं पाहिजे. अशी भूमिका आहे.
घटनेची माहिती समजताच ऑल इंडिया पँथर सेनेचे केज तालुका अध्यक्ष रोशन सरवदे ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांसह पीडितांना भेटले, युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला भेटून गुन्हा दाखल करण्याची व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.