संत श्री सेवालाल महाराज जयंती दिनानिमित्त श्री भाऊरावजी रूडे कनिष्ठ महाविद्यालय उमरी पठार येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

0
686

संत श्री सेवालाल महाराज जयंती दिनानिमित्त श्री भाऊरावजी रूडे कनिष्ठ महाविद्यालय उमरी पठार येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
समीर मलनस

संत श्री सेवालाल महाराज जयंती दिनानिमित्त श्री भाऊरावजी रूडे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय उमरी पठार तालुका आर्णी येथे दिनांक ८/२/२०२१ सोमवार रोजी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. शालेय महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे तथा स्वतः श्रमदानाचे महत्त्व कळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या श्रमदानातून महाविद्यालयात वृक्षारोपण केले दिवसेदिवस वाढत चाललेल्या प्रदूषण व त्यामध्ये पर्यावरणाची होत असलेली हानी या सगळ्या गोष्टीचा होणारा मानव जातीवर दुष्परिणाम हा विचार करता विद्यार्थ्यांच्या व जगाच्या भावी पिढीचा विचार करता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांचा तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा सहभाग होता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाऊरावजी रुडे महाविद्यालयाचे संस्थापक सन्माननीय गणेश जी रुडे सर हे होते. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री दत्ता शेरे सर हे होते तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री मलनस सर, प्राध्यापक श्री निरंजन राठोड सर, प्राध्यापक श्री शुभम नाईक सर, प्राध्यापिका कु. मीनाक्षी राठोड मॅडम आणि प्राध्यापक श्री विनोद शेगर सर व तसेच लॅब सहाय्यक श्री अविनाश रुडे सर व लिपिक श्री विशाल सावंगेकर व कर्मचारी वर्ग श्री अंकज रत्ने भाऊ, श्री पुरुषोत्तम राठोड, श्री अर्जुन धुर्वे, श्री अतुल राठोड व सर्वत्र विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यामध्ये सहभागी होते. त्यामध्ये कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्री धम्मपाल बोडखे सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंबंधी माहिती दिली व वृक्ष लागवड करून कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here