राष्ट्रवादी कॉग्रेसचे शेतकरी आंदोलन समर्थनास कोरपना येथे रास्ता रोको आंदोलन

0
736

राष्ट्रवादी कॉग्रेसचे शेतकरी आंदोलन समर्थनास कोरपना येथे रास्ता रोको आंदोलन

कोरपना प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

केन्द्र शासनाच्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणी साठी गेल्या ७३ दिवसा पासुन शेतकरी रस्त्यावर आहे. निष्पाप १५५ शेतकऱ्याना जिव गमाविला तरी शासनाला जाग आला नाही अनेक बळीराजे आंदोलना तुन लापता झाले जगाचा पोशी दां आंदोलन करत आहे तरी केन्द्र सरकार शेतकऱ्याप्रती उदासिन व भांडवलदाराचे हित जपण्यात धन्यता मानून डिझल पेट्रोल गैसदरात वाढ करीत सामान्य नागरिकाचे महागाईने कंबरडे मोडीत कृषी कायदा हा शेतकऱ्याच्या फायदयाच नसल्याने देश भर हे विधेयक रद्द करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. राजधानी बार्डरवर सुरु असलेल्या किसान आंदोलना स राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी समर्थन देण्यासाठी कोरपना बस स्टॉप चौफुलीयेथे शनीवार दि ६ फेब्रु ला दुपारी ११ , ३० वाजता सहभागी होऊन समर्थन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता.
आबीद अली नेता रॉ कॉ ,शरद जोगी तालुका अध्यक्ष रा कॉ, सौ रितीका ढवस अ ता म रा कॉ, प्रवीण काकडे, भाऊराव डाकरे, मोनीश शेख, नथू लोंढे, रमेश डाकरे, संभा भुसारी, सोयल अली, प्रवीण जाधव, प्रवीण मेश्राम,
आदी शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी वाहतूक अडवून केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी करून महागाईचा निषेध करण्यात आला. तर डिझेल व पेट्रोल वरील भाव गगनाला भिडले आहेत. मात्र केंद्रशासन अजूनही गाढ झोपेत आहेत शेतकऱ्याला न्याय देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्याच्या समर्थक म्हणून रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते दिलात शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास या समोर तीव्र आंदोलन उभारू असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here