संघारामगीरी येथे धम्म बांधवानी केले चहा व बिस्कीटचे वितरण
शिवापूर (बंदर) येथील युवकांचा उपक्रम
श्रमदानाने पर्यावरणाचे संरक्षण
चिमूर (आशिष गजभिये) । संघरामगिरी येथे आयोजित धम्मसमारोहात सहभागी झालेल्या हजारो धम्मबांधवांना शिवापूर(बंदर) येथील युवकांच्या माध्यमातून धम्मबांधवांना अत्यावश्यक वस्तुचें वाटप करण्यात आले.
संघारामगीरी येथे 30-31 जानेवारी होणाऱ्या धम्म संमारंभात महाराष्ट्रातील ठीक-ठिकाणाहून येणाऱ्या बौद्ध उपासक व उपासिकांचा रात्री ताडोबा अभयारण्यातील संघारामगिरी येथे महाथेरो भन्ते. ज्ञानज्योती यांच्या उपस्थितीत असलेले सर्व धम्म बांधव यांना रात्रीच्या वेळेस जेवणाची सुविधा नसल्यामुळे बंदर शिवापूर येथील सर्व नवयुवक वर्गाने त्यांना रात्रीच्या वेळेस चहा व बिस्कीट दान केले. तरी चहा व इतर प्लास्टिक च्या पिशव्या, वस्तू श्रमदानामार्फत गोळा करून वन्यप्राण्यांना व पर्यावरनास कोणताही धोका होणार नाही यासाठी प्लास्टिक चे कचऱ्याचे विल्हेवाट लावले.
या कार्यक्रमाला उपस्थित शिवापूर बंदर येथील युवक प्रदीप मेश्राम, सुझोन मेश्राम, अनिरुद्ध वासनिक, अखिल वासनिक, सम्यक मेश्राम, शुभम वासनिक, नितेश मेश्राम, निलेश नन्नावरे, सुमेध श्रीरामे, अमोल कावरे, सोनू बोरकर, विवेक मेश्राम, सात्विक वासनिक, हर्षल देहारे, विशाल मुधोळकर, वैभव वाघमारे, नयन वाघमारे, यश मेश्राम, प्रमित पाटील, प्रमित बेले, सुरज कामडी, गौतम वासनिक, सुधाकर लोणारे, अक्षय वहाणे व सर्व गावातील मित्र परिवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.