कटाक्ष:वॉशिंग्टन ते दिल्ली! राजकारण उजव्यांचे! जयंत माईणकर

0
710

कटाक्ष:वॉशिंग्टन ते दिल्ली! राजकारण उजव्यांचे! जयंत माईणकर


प्रति,अंधभक्तांनो,
मला खात्री आहे, आपल्यापैकी प्रत्येकाचा एक ना एक नातेवाईक, मित्र अमेरिकेत आहे. आणि व्हाट्सएप, फेसबुक या सोशल माध्यमांद्वारे तुम्ही त्याच्याशी रोज संपर्कात आहात. त्यांना विचारा ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये काँग्रेसवर केलेल्या हल्ल्याविषयी त्यांचं मत काय आहे. त्यातील बहुतेकजण ट्रम्पनी सुरू केलेल्या बहुसंख्य गोर्यांच्या राजकारणाला विरोध करतील. ते हेही सांगतील ट्रम्पने सुरू केलेल्या या बहुसंख्य गोर्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणात उद्या त्यांच्या मुलांच्या अमेरिकेतील भवितव्याबाबत शंका उत्पन्न होऊ शकते. त्याचवेळी त्यांना भारतात संघ परिवाराद्वारे मोदींना समोर ठेऊन केल्या जाणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारा. अर्ध्याहून अधिक हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करतील. मात्र उर्वरित काही संघ परिवार समर्थक मंडळी मुस्लिमविरोधी राजकारण डोळ्यासमोर ठेऊन मोदींना पाठिंबा देतीलच पण तरीही आपल्या मुलांचं अमेरिकेतील अस्तित्व वाचवायला ट्रम्पला विरोधच करतील. म्हणजेच आपल्यावर आल्यानंतर बहुसंख्यांकांच राजकारण अल्पसंख्यांकांना किती धोक्याचं आहे याची कल्पना त्यांना येते. पण भारतासाठी हिंदुत्वच योग्य अशी दुटप्पी भूमिका ते घेतात. यातीलच संघधार्जिण्या असलेल्या डॉकटरने ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर माझ्या मुलांना त्रास व्हायला नको असं माझ्याजवळ म्हटलं होतं.

जो बायडेन , सिनेट मधील विजय सहन न होऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या सक्रिय उचकवण्याने त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन राजधानीत बराच हिंसक हैदोस घातला. ट्रम्प समर्थकांच काँग्रेसवर चालून जाणं किंवा त्याच्या भिंतींवर चढण्याचा प्रयत्न करणं आणि भारतात बाबरीवर चढून ती पाडणं यात मला तरी काहीही फरक दिसत नाही.
__________________
अमेरिकेत अल्पसंख्य असलेले अनेक भारतीय ट्रम्प यांचा पराभव व्हावा म्हणून आपल्या परीने सक्रिय देखील झाले होते.

पण ते हे समजून घ्यायला नकार देतात कि
संकुचित सामाजिक राजकीय विचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त एकट्या ट्रम्पने रुजवले नाहीत , तर जगाच्या अनेक भागात आज तसे उजव्या विचारसरणीचे नेते सत्तेवर आहेत किंवा होते. व्लादिमीर पुटीन, नरेन्द्र मोदी, शिंझो आबे (जपान), अँजेला मार्केल (जर्मनी), इमॅन्युएल मॅक्रोन (फ्रांस), अगदी ब्रेक्झिट करणारे ब्रिटिश नेतृत्व हेही त्याच पठडीतले!
अतिरेकी देशभक्ती, बहुसंख्य समाजाचं वर्चस्व असावं या विचारांनी भारलेली ही नेते मंडळी. आपण काय काम केलं आहे हे सांगण्यापेक्षा आपले विरोधक कसे चूक आहेत हे आवर्जून सांगतात.देशद्रोही विरोधकांच्या आणि अल्पसंख्याक समाजामूळे आपला विकास होत नाही हेही ते सांगायला विसरत नाही. नोकरी, शिक्षण आणि उच्चपदस्थ व्यक्ती याठिकाणी केवळ बहुसंख्य असावेत हे त्यांचं मत!
ऑस्ट्रेलियात असलेल्या माझ्या एका मित्राच्या मते ट्रम्प एक बिझिनेसमॅन आहे. तो समाजाच्या एका वर्गात खूप लोकप्रिय असला तरीही उच्चशिक्षित वर्गात मात्र तो अप्रिय ठरला. सत्तेसाठी त्यांनी इतकी दुराग्रही भूमिका घ्यायला नको होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 22 कोटीहुन मतदारांनी भाजपला तर ११कोटी मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं. हे सर्वच्या सर्व २२कोटी लोकं अंध भक्त आहेत अस म्हणण्याचं धारिष्ट्य मी करणार नाही. थंडीत कुडकुडत बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार मोदी सरकार पाहून यातील अनेकांना आपली चूक उमगली आहे. त्यामुळे भलेही संघ परिवाराच्या दृष्टीने मी ‘देशद्रोही, माओवादी,अरबन नक्सलवादी
असलो तरीही मी त्यांच्या पातळीला जाऊन भक्तांवर टीका करणार नाही.
मात्र त्या सर्वांना कळकळीच आव्हान करीन की २०१९ ची चूक पुन्हा २०२४ ला करू नका.भारतातील अंध भक्त हे ट्रम्प समर्थकांप्रमाणे दिल्लीत संसदेवर चाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसंही लाखोंच्या संख्येने येऊन कायदा आणि सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याची संघ परिवाराची परंपरा फार जुनी आहे. गोहत्येसाठी संसदेवर आलेल्या साधूंचा मोर्चा असो की राम मंदिर आंदोलन असो , संघ परिवारात या घटना नियमित होत असतात.आणि जसा ट्रम्प समर्थकांना त्यांचा पराभव सहन झाला नाही तसाच मोदी समर्थकानाही सॉरी भक्तांनाही त्यांच्या विश्वगुरुचा पराभव सहन होणार नाही.आणि ते ट्रम्प समर्थकांच अनुकरण करू शकतात. मध्यममार्गी पक्ष हे आपला पराभव सहन करून काही काळ विरोधी बाकावर बसायला तयार असतात.पण उजव्या विचारसरणीच्या लोकांना पराभव सहन करण जड जात. जस मी पुन्हा येईन अशी त्रिवार घोषणा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जड जात आहे. अशा वेळी ही मंडळी माझे कार्यकर्ते माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे चिडले आहेत . पण त्यांनी संयम राखावा अस कार्यकर्त्यांना उद्युक्त करणार आव्हान करतात. डोनाल्ड ट्रम्पनी तसच आव्हान केलं.अशाच प्रकारचा आव्हान बाबरी पाडल्यानंतर संघ परिवाराने केलं होतं. वास्तविक पाहता हे आव्हान केवळ दाखविण्यापुरत असून याद्वारे आपल्या समर्थकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न असतो. तेव्हा अंध भक्तांनो , तुम्ही मला कितीही दूषणे दिली तरीही मी तुम्हाला कधीही देशद्रोही म्हणणार नाही. विरोधी विचारांना देशद्रोही ठरवणं मला पटत नाही. कारण मी मध्यममार्गी आहे. तेव्हा अमेरिकेतील घटनांकडे डोळसपणे पहा. टीका आणि पराभव स्विकारणे हेच लोकशाहीच द्योतक आहे. ते अंगात बाणवा. टीका सहन करण्याची ताकद तुमच्यात नाहीच, महाराष्ट्राचा पराभव तुमच्या जिव्हारी झोंबला आहे.२०२४ ला पराभव झाल्यास तुमची अवस्था काँग्रेसवर चालून जाणाऱ्या ट्रम्प समर्थकांसारखीच असेल. तसे होऊनका!
हीच सदिच्छा!
आपला

जयंत माईणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here