डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची सिंचन विहीर लाभार्थ्यांना विद्युत जोडणी त्वरीत करा

0
797

डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची सिंचन विहीर लाभार्थ्यांना विद्युत जोडणी त्वरीत करा

श्रमिक एल्गार चा निवेदनातून आंदोलनाचा इशारा

पोंभुर्णा प्रतिनिधी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचनासाठी विद्युत जोडणी मागील अनेक महिन्यांपासून रखडली आहे ते विद्युत जोडणी त्वरीत करण्यात यावी अशी मागणी श्रमिक एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रविण चिचघरे यांनी अभियंता विद्युत विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीर व सिंचनाचे साधने तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत. त्यासाठी त्यांना मोटार पंप व विद्युत जोडणीकरीता मागील सात महिन्यांपासून ताटकळत ठेवले आहे त्यामुळे संबंधित निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे हा निधी परत गेल्यास याचा शेतकऱ्यांना मोठे नुकसान होणार आहे.
पोंभुर्णा तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांना सिचन विहिरी व सिंचनाचे साधने मंजूर झाले ते विहीर पुर्ण करुन शेतकरी त्यासाठी लागणारी विद्युत जोडणी साठी विद्युत विभागाकडे रितसर अर्ज हि केला आहे विद्युत विभागाकडुन संबंधित शेतकऱ्यांचे सर्वे हि करण्यात आले.पण मागील सात महिन्यांपासून सदर विज जोडणी करून देण्यात आली नाही.यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. निधी परत गेला तर अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित राहू शकतात यामुळे या सर्व शेतकऱ्यांना त्वरित विद्युत जोडणी करून द्यावी जर येत्या १० दिवसांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची विद्युत जोडणी झाली नाही तर श्रमिक एल्गार संघटना आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रविण चिचघरे यांनी निवेदनातून दिला आहे.निवेदन देताना तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here