युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था, भेंडाळा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मौजा भेंडाळा येथे झाले रक्तदान शिबिराचे आयोजन.
जिल्हात नव्हे तर राज्यभरात कोविड-१९ च्या काळात रक्ताचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. तो काही प्रमाणात भरून निघावा व सरकारी रुग्णालयात गोरगरिब रुग्णांना मोफत रक्त मिळावे, या साठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय रक्तपेढी गडचिरोली यांना सहकार्य करीत आहोत. त्या अनुषंगाने दि. १ जानेवारी 2021 शुक्रवार रोजी ठीक सकाळी १० ते १ च्या दरम्यान युवा संकल्प संस्था, भेंडाळा च्या वतीने रुग्णसेवा या भावणेने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा व्हावा म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन किसान भवन भेंडाळा येथे युवा संकल्प संस्थेच्या विद्यमाने रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मा. आमदार डॉ. देवरावजी होळी साहेब, सौ.मा.वनिताताई पोरेड्डीवार सरपंच ग्रा.भेंडाळा, श्री.मा.श्रीरंगजी मशाखेत्री पो.पा. भेंडाळा, मा. चंदा मॅडम कुंभरे ग्रामसेवक ग्रा. भेंडाळा, सौ.मा.नैनाताई जुवारे ग्रा.स.भेंडाळा,श्री.मा.अधिकारी साहेब,श्री.मा. खोब्रागडे सर मुख्याध्यापक जि. प. भेंडाळा,श्री.मा.तिमा सर, श्री.मा.नरेंद्र भाऊ जुवारे कृषी केंद्र भेंडाळा, युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुल भाऊ वैरागडे,उपाध्यक्ष मा.चेतन भाऊ कोकावार, सचिव श्री.मा.सचिन भाऊ वानखेडे, युवा संकल्प विभागीय उपप्रमुख मा.देवेंद्र तुंबडे, युवा संकल्प ग्रुप चामोर्शी प्रमुख मा.सुरज नैताम, उपप्रमुख मा.प्रशांत चौधरी, सदस्य उमेश भाऊ दिकोंडावर, निखिल वैरागडे, अक्षय गुरुनूले,प्रशांत कुसराम,वैभव मंगर, व गावकरी उपस्थित होते.