सहजं सुचलं ग्रुप साठी दोन शब्द!
सहजसुचलं व्यासपीठ मिळाले
अन् शब्द मज खुणावू लागले
ओठातच विरून जाणारे शब्द
लेखणीतून बोलू लागले!
🌼☀️🌼चंद्रपूर💠 🔶☀️🌀मूल येथील सुपरिचित कवयित्रि व शिक्षिका प्रतिमा नंदेश्वर यांनी सहज सुचलच्या वर्धापनदिना निमित्त एक लेख शब्दांकित केला ताे येथे आम्ही खास वाचकांसाठी देत आहाे 🟢🟩🛑💠🟡 वैदर्भिय जेष्ठ लेखिका मेघा धाेटे व सामाजिक कार्यात अग्रकमी असणां-या मायाताई काेसरे यांनी आपल्या संकल्पनेतून सहजसुचलं ग्रुप निर्माण केला आहे.
🛑🌀🟡या ग्रुपला येत्या १ जानेवारी २०२१ ला चार वर्ष पूर्ण होत आहेत. सहज सुचलच्या वर्धापन दिनानिमित्त मला दोन शब्द लिहिण्याची संधी ग्रुपच्या प्रसिध्दी प्रमुख रसिका ढाेणे व सुविधा बांबाेडे यांनी करुन दिली आहे .त्या बद्दल त्यांचे सर्वप्रथम मनस्वि अभिनंदन ! 🌼💠☀️
☀️🌀✍️सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रतिभावंत अनेक पुरस्कार प्राप्त कर्तृत्ववान महिलांसाठी मेघा धाेटे व मायाताई काेसरे यांनी उपलब्ध करून दिलेलं सहजसुचलं ग्रुप हक्काच एक भव्य व्यासपीठ ठरलं आहे.चंद्रपूरच्या महिला पत्रकार जास्मिन शेख सहजसुचलं ग्रुपच्या कवयित्रि कु.अर्चना सुतार मेकअप आर्टीस्ट कल्याणी सराेदे वंदना हातगांवकर डाँ अंजली साळवे ,स्मिता मेहेत्रे , वंदना आगरकाठे ,नयना झाडे , विमल काटकर , श्रूति उराणकर , म्रूणाली भगत , व इतर त्यांच्या सहकारी महिला भगिनी यांचेही कार्य कौतुकास्पद व आम्हास प्रेरणादायी आहे.किरण घाटे सर कुठलीही बातमी असो अगदी मोजक्या शब्दात दमदार लेखन करून त्वरित लावतात. त्यांचे प्रत्येक बातमीपत्र बोलके असते.प्रत्येक क्षेत्रातील महिलांचे कार्य त्यांचे छायाचित्रे किरण घाटे सर ग्रुपवर टाकतात.सुंदर सुंदर छायाचित्रे लक्षवेधी व मनाचा वेध घेणारे असतात.सहजसुचलं ग्रुपमुळेच प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होत आहे. लोकांपुढे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपला चेहरा येत आहे.हे आम्हा महिलांसाठी कौतुकास्पद व गर्वाची गोष्ट आहे.विविध पुरस्कार प्राप्त अर्चना सुतार मँडममुळे देखिल सहजसुचलं ग्रुपची आणखीनच शोभा वाढली आहे. किरण घाटे सरांसारख्या प्रतिभावंताच्या सहवासात राहून सहजसुचलं ग्रुप अनुभवतांना खुपकाही शिकायला मिळते आहे. आपण या ग्रुपचा भाग आहोत याचा मनाला खुप आनंद पण होतो आहे. योग्य भाषाशैली,बातमीपत्राची समर्पक शब्दात अप्रतिम मांडणी असते.प्रतिमा, प्रतिभा व बुद्धी यांचा त्रिवेणी संगम किरण घाटे सरांच्या लेखणीत जाणवतो.त्यांच्या प्रभुत्वसंपन्न व्यक्तीमत्वास प्रणाम.🌀🛑🟡किरण घाटे सरांनी आपल्या मनातील विचार, भाव,भावना व्यक्त करण्यासाठी ‘सहजसुचलं काव्यकुंज’ हे एक हक्काच व्यासपिठ उपलब्ध करून दिल आहे.नवोदितांनी हसत खेळत रोज या व्यासपीठावर व्यक्त होत राहिले पाहिजे.
सहजसुचलं ग्रुपरील सर्व महिलांशी आपूलकीचे नाते निर्माण झाले आहे.सजहसुचलं ग्रुप म्हणजे एक कुटुंब आहे.असे मला म्हणावेसे वाटते. किरण घाटे सरांच कार्य सर्व महिलांसाठी अतिशय मोलाच कार्य आहे.या वयातही न थकता प्रत्येक काम जबाबदारीने मेहनत घेऊन पूर्ण करीत आहेत.त्यांचे कार्य आम्हास अभिमानास्पद आहे.एवढे लिहून माझ्या या अल्पशा लेखाला येथेच पूर्णविराम देते.
🌀🛑सौ.प्रतिमा प्रकाश नंदेश्वर ☀️कवियत्री💠व लेखिका🌼
ता.मूल जि.चंद्रपूर☀️🟡