अवैध रेती तस्करींबाबत – चंद्रपूर खनिकर्म विभागाची यशस्वि कामगिरी
३२अवैध रेतीची वाहने जप्त ; ४१लाखांपेक्षा अधिक दंड वसूल
🟥🟪चंद्रपूर 🟡☀️🟡🟢किरण घाटे🟣चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे १५०ते २००रेती घाट आहे. परंतू या वर्षाच्या डिसेंबर महिण्यांचे तिस-या आठवड्या पर्यंत रेती घाट लिलावात गेले नव्हते .त्यामुळे अवैध रेती तस्करांचे चांगलेच फावले हाेते .जिल्हाभर अवैध रेती नेण्यांचा दिवस रात्र सपाटा सुरु हाेता .नागरीकांच्या तक्रारी वर तक्रारी हाेवू लागल्या हाेत्या .सर्व सामान्य जनतेनी वरिष्ठांकडे देखिल लेखी स्वरुपात तक्रारी सादर केल्या हाेत्या 🟡🟣☀️नंतर चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या सर्व तक्रारींची रितसर दखल घेत महसुल विभागासह स्थानिक खनिकर्म विभागाच्या पथकांना या सुरु असलेल्या अवैध उत्खननांवर अंकुश लावून रेती वाहनांवर व आढळणां-या अवैध रेती साठ्यांवर धडक कारवाया करण्यांचे निदेैश दिले .🟣☀️🟡दरम्यान लगेच येथील खनिकर्म विभागाच्या पथकातील खनिज निरीक्षक बंडू वरखेडे , अल्का खेडकर व दिलीप माेडक यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडेकर तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली जिल्हाभर दाैरा करुन गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहने पकडली .माहे एफिल ते डिसेंबर या कालावधीत याच खनिकर्म विभागाच्या पथकाने तब्बल ३२अवैध रेती वाहनांवर यशस्विरित्या धडक कारवायां करुन दंडापाेटी वाहन मालकांडुन ४१लाख ६३हजार तिनशे साठ रुपये दंड वसूल केला .या सततच्या धडक कारवायांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे .अद्यापही खनिकर्म विभागाच्या अवैध रेती वाहनांवर कारवायां सुरु असल्याचे असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते .एकीकडे सातत्याने हाेणा-या कारवाया मुळे रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले तर दुसरी कडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी याच खनिकर्म विभागाच्या या कारवायांचे स्वागत केले आहे .🟣☀️🟡खनिकर्म विभागाने आपले लक्ष राजूरा व ब्रम्हपूरी तालुक्यातील रेती माफियांकडे पुरवावे अशी मागणी आता जाेर धरु लागली आहे .त्याच साेबत🟣☀️चंद्रपूर शहरातील बिनबा गेट व पठाणपूरा गेट परिसरातील अवैध रेती तस्करांवर लक्ष केन्द्रीत करण्यांची अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त हाेत आहे .🟣🌼🟢☀️या रेती तस्कारांवर खनिकर्म विभाग कसे लक्ष पुरवितात या कडे आता चंद्रपूरकरांच्या नजरा खिळल्या आहे .🟣☀️🟢सध्याच्या परिस्थितीत खनिकर्म विभागाची कामगिरी काैेतुकास्पद व उल्लेखनिय असल्याचे जनतेत सर्वत्र बाेलल्या जात आहे. हे मात्र तेवढेच खरे आहे .