डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संघर्षासाठी प्रेरीत करणारे – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर🟢🟪किरण घाटे🔵🟢
☀️💠कोणतीही गोष्टी संघर्षाशिवाय साध्य होत नाही. आपला हक्क अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. समाजातील काही घटकांना अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर डॉ बाबासाहेबांनी संघर्ष केला. त्यांच्या याच संघर्षातून पुढे क्रांती घडली. त्यांचे हेच विचार अन्याय, अत्याचारा विरोधात संघर्षासाठी प्रेरीत करणारे असल्याचे प्रतिपादन *आ. किशोर जोरगेवार यांनी केले.🟪🔵🟢💠 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या महापरिर्निवाण दिना निमित्य आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. 🟪🔵🟢💠यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. 🔵🟢🟩🟡यंग चांदा ब्रिगेडचे विदयार्थी शाखेचे अध्यक्ष अजय दुर्गे, महिला शहर संघटिका वंदनाताई हातगावकर , पुण्यवर्धन मेश्राम, विमल काटकर, वैशाली रामटेके, समीक्षाताई आसेकर, रचनाताई धोटे, ममता पानेमवार, संजना पानेमवार, पायल दुर्गे, राजश्री देशमुख, प्रगती चुणारकर, स्वाती मेश्राम, मजहर बेग, निखिल काटोले, स्वप्नील पथाडे, पंकज धोटे, सचिन माहोरकर, प्रशांत अवथरे, विनोद दुर्गे, प्रशांत तावाडे,पवन वाकडे,प्रफुल पाझारे, आकाश झाडे, अजय अवथरे, सत्यवान लाटेलवार,भाग्यश्री हांडे, कल्पना शिंदे, वंदना वाघमारे, कौसर खान, वैशाली मेश्राम, कांचन बन्सोड, वैशाली रत्नपारखी, चंदा करमणकर, कल्पना मानकर, छबीता खोब्रागडे, आशा देशमुख, संगीता कार्लेकर* आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, भारताच्या किर्तीवंत सुपुत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. त्यांचे विचार सक्षम समाजाकरीता उपयोगी असून ते शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम येत्या काही दिवसात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी 20 हजार संविधानाच्या लुघू पुस्तिका प्रकाशीत करुन त्या शालेय विद्यार्थ्यांसह समाजात वाटप केल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
.