युवकाचा वृध्दमहिलेवर अत्याचार

0
828

युवकाचा वृध्दमहिलेवर अत्याचार

महालगाव (काळू) येथील घटना ; आरोपीला अटक

चिमूर : आशिष गजभिये । तालुुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महालगांव( काळू ) गावात एकीकडे संविधान दिन साजरा करण्यात येते तर त्याच २६ नोव्हेंबर चे रात्री १० वाजता दरम्यानच्या काळात महालगांव ( काळू ) येथील एका वयोवृध्द ९० वर्षाच्या म्हातारीवर घराशेजारी राहत असलेला नराधम नरेंद्र संभाजी नन्नावरे या ३३ वर्षाच्या विकृत वृत्तीच्या नराधमाने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून उशीने तोंड दाबून सदर ९० वर्षाच्या वृद्ध महिलेवर बळजबरी अतिप्रसंग केला. त्या म्हातारीने आरडाओरडा केली असता नागरीकांनी आवाज ऐकताच शेजारी धावून आले . त्यात झटापट होऊन आरोपीने पळ काढला घटनेची तक्रार भिसी पोलिसांना केली असता फिर्यादी यांच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी २४०/२० कलम ३७६,४५०,३२३ भा.द.वि. गुन्हा नोंद दाखल केला आहे.सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे सदर आरोपी किरकोळ गुन्ह्यामध्ये सक्रीय असुन आहे , आरोपी भिसी पोलिस कस्टडीत असुन अधिकचा तपास पि. एस. आय. सचिन जंगम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here