श्रमसाफल्य मंडळाच्या मागणी नुसार दादर मधील प्रसिद्ध “शिवाजी पार्क” चे नाव अखेर “छत्रपती शिवाजी महाराज मैदान”
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
श्रमसाफल्य मंडळ यांनी केलेल्या मागणीनुसार दादर येथील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर बदलण्यात आले आहे, “शिवाजी पार्क” यापुढे ” छत्रपती शिवाजी महाराज मैदान” या नावाने ओळखले जाणार आहे.
अलीकडेच महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली होती. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता. सदर मैदानावर अनेक राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचेही आयोजनही होतात.
दि. ०७-०३-२०१९ रोजी श्रमसाफल्य मंडळाच्या वतीने महानगर पालिकेला नावात दुरूस्ती करण्यासाठी दिलेल्या पत्रक व मंडळाचे सरचिटणीस श्री. प्रमोद प्रकाश सावंत यांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे.
शिवाजी पार्क चे पहिले नाव माहिम पार्क असे होते. १० मे १९२७ रोजी मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मैदान असे करण्याची मागणी श्रमसाफल्य मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होते आणि अनेक वर्षे त्यांनी पालिकेकडे पाठपुरावा देखील केला होता. अखेरीस अनेक तडजोड करून या कार्याला यश आले असुन या पुढे शिवाजी पार्क मैदान हे “छत्रपती शिवाजी महाराज मैदान” असे ओळखले जाणार आहे. त्यामुळे श्रमसाफल्य मंडळाने मनःपूर्वक अभिनंदन महानगरपालिका ला दिले आहेत.