हिंगणघाट येथे तहसील कार्यालय समोर काल राज्य सरकारच्या वीज बिलाची होळी
अनंता वायसे
कोरोना महामारी त्यात आलेले वाढीव वीज बिल यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. महाराष्ट्र सरकार मधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून विजेचा बिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादत आहे.
लॉकडाऊन च्या काळामध्ये सामान्य नागरिकांना तेव्हाच्या तेव्हा विज बिल आल्यामुळे सामान्य नागरिक अनेक महिन्यापासून त्रस्त आहे व अनेक महिन्यापासून या महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्रातील जनता वीज बिलामध्ये सवलत देण्याची मागणी सुद्धा करत आहे. मध्यंतरी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला आम्ही काही प्रमाणामध्ये वीज बिल माफ करू अशा प्रकारचे आश्वासन सुद्धा दिलं होतं परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला वीज बिल माफ करण्याची वेळ आली त्यावेळी महाराष्ट्रातील सरकारने आपल्या आश्वासनांपासून घुमजाव केला व सामान्य जनतेला अधिक आर्थिक संकटामध्ये लोटलेल आहे हे सर्वसामान्य जनतेच आर्थिक शोषण आणि नुकसान आहे हे राज्य सरकारने करू नये राज्यातील सामान्य जनतेला या वीज बिल यापासून सवलत मिळावी याकरिता हिंगणघाट येथे तहसील कार्यालय समोर माजी ऊर्जा कॅबिनेट मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच संकेतजी बावनकुळे, जिल्हा महामंत्री किशोरजी दिघे, नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतनी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सरकारने दिलेल्या वीज बिलाची होळी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये भाजपा जिल्हा महामंत्री किशोरजी दिघे, मिलिंद भेंडे, नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतनी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिनजी मडावी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी गफाट, भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकूर, भाजपा नगराध्यक्ष आशिषजी परबत, भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाने, समुद्रपूर तालुका अध्यक्ष संजय डेहणे, वामनरावजी चंदनखेडे, भाजपा जिल्हा महिला सचिव सौ. छायाताई सातपुते तुषार आंबटकर, योगेश बोंडे, नगरसेविका रवीलाताई आखाडे, श्री. शिवाजी आखाडे, स्टार प्रचारक राकेश शर्मा, दिनेश वर्मा, विठू बेनीवार, रोशन पांगुळ, दादू इंगोले, नगरसेविका शारदाताई पटेल, शुभांगीताई डोंगरे, अल्पसंख्यांक भाजपा जिल्हाप्रमुख बिस्मिल्ला खान, गंगाधरजी कोल्हे, बंटी वाघमारे, अनिलभाऊ गहेरवार संजूभाऊ खत्री इत्यादी भाजपा व भाजयुमोचे कार्यकर्ते तसेच हिंगणघाट नगरातील नागरिक मोठ्या संख्येने सदर वीज बिलाची होळी करण्यास उपस्थित होते.