दुचाकीला सुरजागडच्या ट्रकची धडक – एक जण जागीच ठार, एक जखमी
चामोर्शी, सुखसागर झाडे : तालुक्यातील मुरखळा (माल) येथील दुचाकीनी कामावर जात असताना सुरजागड लोह खनिज कंपनीच्या ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला.
ही घटना आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास लगाम बोरी जवळ घडली. मृतकाचे नाव अतुल रामदास बुरे (वय ३८, रा. मुरखळा (माल) असे असून जखमीचे नाव वैभव अरुण आत्राम (वय २८, रा. कॅमएरिया, जि. गडचिरोली) असे आहे. हे दोघेही सुरजागड लोह खनिज कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. माहितीनुसार, सकाळी सुमारे ८:३० वाजता ते मुरखळा (माल) येथून दुचाकीने कामावर जात असताना लगाम बोरी जवळ ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात अतुल बुरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैभव आत्राम हे किरकोळ जखमी झाले.अपघातानंतर मृतदेह गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (PM) पाठविण्यात आला आहे. जखमी वैभव आत्राम यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी नुकसानभरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.









