प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळेंच्या “बायोग्राफी” ला प्रेक्षकांची पसंती.
गडचांदूर/प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर गिरीधर काळे हे मागील अंदाजे 34 वर्षांपासून अस्थिरुग्णांवर पारंपरिक व निसर्गोपचार पद्धतीने उपचार करत असून बिबी ग्रामसभेत यांना “डॉक्टरेट” पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.गिरीधर काळे हे कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता अगदी मोफत व निःस्वार्थ भावनेने सेवा देतात.लोकसेवेमुळे समाजातील प्रत्येक घटक डॉ.काळे यांच्या या कर्तुत्वाला सलाम करतो हे मात्र विशेष.
डॉ.गिरीधर काळे अगदी सकाळ पासून रुग्ण संपेपर्यंत अविरत आपली सेवा सुरू ठेवतात.अनेक सेवाभाव जोपासणाऱ्या तरुणांचे हे आदर्श बनले असून यांच्या जन्मदिनी जिल्ह्यात कित्येक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.”समाजसेवक गिरीधर भाऊ काळे प्रतिष्ठान” मागील 9 वर्षांपासून दरवर्षी फटाके मुक्त दिवाळी साजरी करतात.तसेच “दिव्यग्राम” अंतर्गत समाजसेवा करणाऱ्या लोकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानीत करत आहे.आजतागायत 5 लाख लोकांना निःशुल्क सेवा देऊन उपचार केलेल्या डॉ.काळेंच्या जीवनावर आधारीत एक व्हिडिओ हल्ली यू-ट्यूबवर लोकांच्या पसंतीला उतरला आहे.ज़हीर व्हॉईस(Jahir Voice)या चॅनलवर प्रसारीत “डॉ.काळेंचे जीवन चरित्र” दोन दिवसात अगदी 1हजाराच्यावर प्रेक्षकांनी पाहिले आहे.समाजसेवक डॉ. गिरीधर भाऊ काळे प्रतिष्ठानतर्फे या चॅनलचे संचालक प्रा.ज़हीर सैय्यद यांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन गौरवण्यात आले आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र तसेच भारत सरकारने डॉ. काळे यांच्या अशा निस्वार्थ लोकसेवेची दखल घेऊन त्यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करावे अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.