बेलारा येथील तरुण शेतकऱ्यांचा सोलरचा करंट लागून मृत्यू
चिमूकल्याचे हरपले आईवडिलांचे छत्र
पत्नी पोळ्याच्या सणाला तर पती दिवाळीला असा मृत्यू चा अभद्र योगायोग
विकास खोब्रागडे
पळसगांव(पिपर्डा) । चिमूर तालुक्यातील बेलारा येथील प्रमोद रामचंद्र जीवतोडे वय – ३० वर्ष हे शेतामध्ये शेतपीकाला पाणी करण्यासाठी गेले असता सोलर वीजेचा झटका लागुन म्रुत्यु झाल्याची घटना शुक्रवार दीनांक १३/११/२०२० ला घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चिमुर तालुक्यातील विहीरगांव जवळील बेलारा येथील प्रमोद रामचंद्र जीवतोडे हे १३ नोव्हेबंरला दुपारी २ वाजता पळसगांव येथे आठवडी बाजाराला गेले होते . जंगली जनावरांना हाकलण्यासाठी ते शेतावर तीकडुनच गेले होते .त्यांची शेती विहीरगांव हलक्यातील देवरा बोडी पाट नाल्यावर आहे . शेतामध्ये मिरची पेरली आहे.त्या पीकासाठी बाजाराहुन पळसगांव येथुन परत येत असतानी पाणी करण्यासाठी गेले होते.पाणी करीत असतानी देवरा बोडी पाटात उतरले होते तेव्हा त्यांना सोलर वीद्युतचा झटका लागुन जागीच म्रुत्यु झाल्याची घटना घडली. कुटुबांनी शोधाशोध केली असता रात्रो १२ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे .ही माहीती पोलीस विभागाला कळताच चिमुर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्सटेबल विलास नीमगडे ,सचीन गजभीये १३ नोव्हेबंरच्या रात्रो १२ वाजताच्या दरम्यान घटना स्थळी पोहचले. व पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी शवाला उपजील्हा रूग्णालय चिमुर येथे पाठवीण्यात आले. पुढील तपास हेड कॉन्सटेबल विलास नीमगडे करीत आहेत.सविस्तर वृत्त असे की,प्रमोद हा गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या विरहात दोन मुलाना घेऊन जगत होता त्याचे पाच वर्षपूर्वीच लग्न झाले होते. त्याला दोन मुले आहेत एक 3 वर्षाचा नैतीक तर दुसरा 2 वर्षाचा मुले आहेत.शेतीच्या फळबाग करून कसेबसे घर चालायचे परंतु गेल्या वर्षीच्या पोळ्याच्या दिवशी त्याचा पत्नी मालुताईचा दुर्दवी रित्या अल्पशा आजाराने निधन झाले होते .मृतदेहाची शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णलाय चिमूर ला पाठविले आहे,पुढील तपास शिंदे पोलीस निरीक्षक चिमूर यांच्या ,विलास निंमगडे पोलीस तपास करीत आहेत.अशी दुर्दैवी घटना घडली याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या घरी आई – वडील,भाऊ व एक बहिण आहे. प्रमोद हा त्यांचा घरात गांवतील हुशार व सामाजिक आवड असणारा मुलगा असल्यामुळे त्यांच्या घरातील दिवाच मावळला आहे. ही घटना बेलारा या गावासाठी दुर्दैवी असून गावात आता शोककळा पसरली आहे.