खडसंगी परिसरात अवैध फटाकेविक्रीला उधाण
स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाचे दुर्लक्ष
चिमूर / आशिष गजभिये
तालुक्यातील खडसंगी ग्रामपंचायत परिसरात अवैधरित्या किरकोळ फटाकेविक्रीला उधाण आले आहे.परवानाप्राप्त व्यावसायीकानीं फटाके विक्री करावी या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला डावलू विनापरवाना अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत या कडे स्थानीक प्रशासनासह संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
दिवाळीसणाची सुरुवात झाली असून या वर्षी कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णामध्ये वायुप्रदूषनाने वाढ होणार असल्याची तज्ञांनी भाकीत केलं. हे लक्षात घेता राज्यसरकारने काही महानगरात फटाके विक्री व फोडण्यासाठी निर्बध लादले आहेत,उर्वरित ठिकाणी रात्री८.०० ते १०.०० पर्यंत फटाके फोडण्यास मुभा दिली आहे.
या बाबत जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी आवाहान करीत दिव्यांच्या पताकसह दिवाळी साजरी साजरी करण्याचे आव्हान केलं आहे सोबत फटाके फोडण्यासाठी(चंद्रपूर मनपा हद्द वगळून) रात्री८.०० ते १०.०० मुभा देण्यात आली आहे,यासह किरकोळ फटाके विक्री करण्यासाठी परवानाप्राप्त व्यावसायिक अनिवार्य असल्याचे जाहीर केलं आहे. पण जिल्ह्याधीकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत तालुक्यातील खडसंगी परिसरात अनेक अवैध फटाके व्यावसायिकांनी दुकान थाटले असून या प्रकाराला स्थानिक प्रशासनाने मूक संमती दर्शवित मौन धारण केले असून या कडे संबंधित विभागाणे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी परवानाधारक व्यावसायिकांकडून होत आहे.