कोरोना जनजागृती काव्यधारा – १९
कवी – सुनिल कोवे, बल्लारपूर
कविता : माझे कुटुंब माझी जबाबदारी
माझे कुटुंब माझी जबाबदारी
कोरोना विरुद्धच्या लढाईतील एक अस्त्र
स्वसंरक्षण हाच एक रामबाण उपाय
कुटूंबधिष्ठीत जगणे हेच खरे शास्त्र.
शासनाचा कोरोनापासून बचावासाठीचा
त्याला हद्दपार करण्याचा
शेवटचा प्रहार
मोहिमेद्वारे प्रसार नियंत्रणात आणून
करुया लोकसहभागातून कोरोना संहार.
वैद्यकीय आणिबाणीत “माकुमाज” चा सर्वे,
कोरोना प्रार्दुभाव रोखण्याची
चळवळ खास
स्वच्छतेच्या सवयी
सामाजिक भान पाळू अन् जिंकू
मोहिमेच्या निमित्ताने
पथक देत होते विश्वास
‘कोरोना’सारखे साथीचे रोग
भविष्यात नाकारता कसे येणार.
“माकुमाज” चा सर्वे लोकचळवळ व्हावी
समोर हा मॉडेल नक्कीच मार्गदर्शक ठरणार
महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम
दोन टप्प्यात,
तापमान,ऑक्सिजन मोजायचं
जाऊन घरोघरी
पथकाची कोरोना बाबत जनजागृती मोहीम,
मास्क, सॅनिटायझर
घ्या सोशल डिस्टंसिंगची खबरदारी
बोलू नका फेस टू फेस
मास्क चा वापर करा
कामाशिवाय बाहेर पळू नका,
गर्दी टाळा, वारंवार हात धुवा
हाच मंत्र खरा…
कवी : सुनिल कोवे, बल्लारपूर
संपर्क. ९४२२८३९५७
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)