गडचिरोली जिल्ह्यातील ५ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली
आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली सहविचार सभा
गडचिरोली :- सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या निवारणार्थ सभा दि. १७/०२/२०२६ ला आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या दालनात पार पडली.
सदर सभेमध्ये सुरवातीला मागील सभेच्या इतिवृतामधील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक प्रलंबित प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली काढण्यात आली.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शिक्षण विभाग अधिनस्त लेखाधिकारी यांच्या कार्यालयाच्या अनेक तक्रारी येत असल्याने या सर्व बाबींची शहानिशा करून सदर आस्थापनेची तात्काळ चौकशी ही सुरू करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबतची नोंद हि इतिवृतामध्ये घेण्यात यावी, अशा सूचना यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यालयातील प्रलंबित अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रकरणे, शालार्थ आयडी प्रकरण, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदाच्या प्रलंबित मान्यता, वरिष्ठ/निवड श्रेणी प्रकरणे, प्रलंबित वैद्यकीय देयके, शिक्षक सेवक पदाची मान्यता, थकीत देयके, प्रलंबित पेन्शन केस, शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्याबाबतची सद्यःस्थिती, समायोजित शिक्षकांचे थकीत देयकाची सद्यःस्थिती, मंडळ मान्यता खाते मंजुरी प्रकरणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी देयक अशा अनेक सामूहिक व वैयक्तिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व सदर प्रकरणे वेळेमध्ये निकाली काढण्याच्या सूचना यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राजेश सातपुते साईनाथ विद्यालय, मक्केपल्ली (ता. चामोर्शी) यांचे वरिष्ठ श्रेणी प्रकरण, नागेश्वर गेडाम (शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा, ता. कुरखेडा) आणि प्रकाश मठे विवेकानंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मानापूर देलनवाडी ता. (आरमोरी) यांचे निवड श्रेणी प्रकरणे, पी. डी. दुधे (सहा. शिक्षक) भगवंतराव हायस्कुल, नरसिंहापल्ली (ता. सिरोंचा) यांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार प्रदान करण्याचे अधिकार तसेच धनेंद्र चौधरी (पर्यवेक्षक, शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली) यांच्या उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने मान्यता पुढील आदेशापर्यंत मान्यता असे एकूण सभेमध्ये ऑन द स्पॉट ५ प्रकरणे निकाली काढण्यात आले तसेच उर्वरित प्रकरणे २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निकाली काढण्याच्या सूचना यादरम्यान आमदार अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, वेतन पथक अधिक्षक (माध्य.) विवेक नाकाडे , उपशिक्षणाधिकारी अमर गेडाम ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ सदस्य दिलीप गडपल्लीवार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष विजय कुत्तरमारे, संजय घोटेकर, बापू मुनघाटे, मनोज निंबार्ते, किशोर पाचभाई, संजय कुनघाडकर, अजय वर्धलवार, संदीप अर्जुनकर, अरविंद भैसारे, यशवंत रायपुरे, संजय खांडरे, सतीश धाईत, राजू म्हस्के,जगदीश खरवडे, शरद गायकवाड, सोरते सर, संघटनेचे पदाधिकारी तसेच समस्याग्रस्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.









