मूलच्या बुध्द टेकडीवर १६वा वर्धापन दिन साेहळा अनेकांच्या उपस्थितीत संपन्न !
किरण घाटे :- एकीकडे जगभर महाभयानक काेराेनाचे संकट पसरले असतांनाच सर्व शासकीय नियमांचे काटेकाेर पालन करत काल बुधवार दि.४नाेव्हेंबरला मूल च्या बुध्द टेकडीवर १६व्या वर्धापन दिनांचा एक छाेटा खानी कार्यक्रम पार पडला .याच बुध्द टेकडीवर दरवर्षि भव्य प्रमाणात हजाराे बाैध्द बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा हाेत असताे परंतु (यंदाच्या वर्षात) काेराेना संकटामुळे भव्य स्वरुपात हा कार्यक्रम हाेवू शकला नाही अशी खंत दिलीप गेडाम यांनी या प्रतिनिधी जवळ बाेलतांना काल व्यक्त केली .कार्यक्रमाच्या आरंभीच अनेक समाज बांधवानी महामानव भगवान गाैतम बुध्द व डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना पुष्पमाला अर्पित करुन अभिवादन केले या वेळी बाैध्द विकास मंडळाचे पुरुषोत्तम साखरे , विनाेद निमगडे , लक्ष्मीकांत डाेर्लीकर , विश्रांती गेडाम , रंगनाथ पेडुरकर , काजू खाेब्रागडे , पुंजाताई रामटेके सिमा चिकाटे , सिध्दार्थ पेरके तदवतच मूल व आजुबाजुच्या परिसरातील उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित हाेत्या .कार्यक्रम स्थळी मूल पाेलिस विभागाच्या वतीने तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता. तर महसुल विभागाचे नायब तहसिलदार प्रूथ्विराज साधनकर व मंडळ अधिकारी अनुप खाेब्रागडे बुध्द टेकडी वर जातीने हजर हाेते .