घुग्घुस शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पोलीस ठाणे पर्यत रस्ता दुरुस्ती करा – म.रा. पत्रकार संघ
घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पोलीस ठाणे पर्यत रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे पडले असून या खड्यामुळे रोज छोटे -मोठे अपघात होत असतात.तसेच या रस्त्यावरून वेकोली, एसीसी (अदानी), व इतर कंपनीची वाहने रस्त्यावरून ये -जा करतात या वाहनाच्या चाकाला लागून आलेली माती रस्त्यावर विखूरल्या जात असल्यामुळे रस्त्यावरील धुळीच्या प्रमाणात वाढ झाली असून या धुळीमुळे सर्दी, दमा, खोकला, चर्मरोग अशा विविध रोगांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. तरी रस्त्यावरील धूळ साफ करून सकाळ, दुपार व सायंकाळी या तिन्ही वेळेस नगर परिषद तर्फे रस्त्यावर पाणी मारावे व रस्त्यावरील प्रदूषण कमी करावे अशी मागणी मुख्याधिकारी रांजणकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, शाखा घुग्घूस च्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने उभारलेले एक आरोग्य केंद्र. हे केंद्र लोकांना मूलभूत आरोग्य सेवा पुरवते, जसे की आजारांचे निदान, उपचार, लसीकरण, आणि आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्यात येते. नगरपरिषदचे मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यांच्यावर लक्ष वेधत निणर्य घेणार का! लोकांचे लक्ष वेधले.
याप्रसंगी म. रा. पत्रकार संघांचे शाखा अध्यक्ष सुरेश खडसे, कार्याध्यक्ष संजय पडवेकर,उपाध्यक्ष इम्तियाज रज्जाक, कोषाध्यक्ष क्यामुल सिद्धिकी, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष साहिल सैय्यद , सदस्य दशरथ आसपवार, कल्याण सोदारी व राहुल चौधरी उपस्थित होते.