वीर बाबुराव शेडमाके इंग्रजांच्याविरोधात बंड पुकारनारे थोर क्रांतिकारी : विवेक बोढे
मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
घुग्घुस : येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बुधवार, १२ मार्च रोजी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात गोंड साम्राज्य होते. हे साम्राज्य इंग्रजांनी काबीज केले नंतर इंग्रजांनी हुकूमशाही व जुलूमशाही सुरु केली. लोकांवर सुरु असलेला हा अन्याय वीर बाबुराव शेडमाके यांनी पाहताच इंग्रजांच्याविरोधात बंड केले तसेच थोर क्रांतिकारी शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांच्याविरोधात सशस्त्र उठाव केला अनेक इंग्रजांचा त्यांनी खात्मा केला. शेवटी इंग्रजांनी त्यांना कैद केले शहीद बाबुराव शेडमाके यांनी वीरमरण पत्कारत फासावर गेले.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, सुनंदा लिहीतकर, संदीप तेलंग, हनुमान खडसे, उमेश दडमल, गणेश राजूरकर, शीतल कामतवार, भारती परते, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम आदींची उपस्थिती होती.