आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात शहिदवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची जयंतीनिमित्त अभिवादन
अन्याय बघुन वीर बाबुराव शेडमाके यांचे रक्त सळसळत – संजय तिवारी
घुग्घुस येथील आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.१२ मार्च २०२५ बुधवार रोजी शहिदवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची १९२ वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आ.किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजप नेते संजय तिवारी आपल्या मनोगत व्यक्त करीत भाजप कार्यकर्ते व अन्य मान्यवरांना सांगत होते की, विभाजन पूर्व चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात गोंड राजांचे वर्चस्व होते.पुढे येथील सत्ता इंग्रजांनी काबीज केली. ब्रिटिश काळात जनतेवर अन्याय अत्याचार सुरु होते. जनतेकडून अवाजवी कर वसूल केला जायचा. हा अन्याय बघून वीर बाबुराव शेडमाके यांचे रक्त सळसळत होते. इंग्रजा विरोधात उठाव करण्याच्या त्यांनी निश्चय केला. आपल्या सवंगड्यांना घेऊन २४ सप्टेंबर १८५७ ला ‘जंगोम सेना’ उभी केली. जंगोम या शब्दाचा अर्थ गोंडी भाषेत क्रांती, जागृती असा होतो. इंग्रजविरोधात त्यांनी तीन लढाया लढल्या. या तीनही युद्धात जंगोम सेनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. शेवटी कपटनीतीने इंग्रजांनी वीर बाबुराव शेडमाके यांना पकडलं.
इंग्रजांनी वीर बाबुरावांच्या हातपायाला लोखंडी बेड्या घालून चंद्रपूरात आणले. वीर बाबुरावांना शिक्षा देण्यासाठी विशेष न्यायालयाची व्यवस्था जेलमध्ये करण्यात आली होती. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी जेलच्या समोरील पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली. पिंपळाच्या मोठ्या फांदीला तागाची दोरी बांधल्या गेली.वीर बाबुराव शेडमाके देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले.
याप्रसंगी भाजप नेते इमरान खान,मुन्ना लोडे,शाहरुख शेख, स्वप्नील वाढई,शाम आगदारी,शरद अवताडे,एंकटी मोरपाका, शंकर वाढई,ललीत होकम, मंदेश्वर पेंदोर,अंकेश मडावी,मनिषा मेश्राम, सुजाता उईके, प्रतिभा उईके,रंजनी होकम, दुर्गा सोपान मडावी, स्वेजल उईके,समिक्षा मडावी, शालीनी खोबरे, नितु जयस्वाल, भारती सौदारी,सुनंदा सौदारी, कामिनी देशकर, शानु कामतवार आदी उपस्थित होते.