महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार येथे बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने महाबोधी विहार मुक्ती आंदोलन व महाबोधी विहार बौद्ध भिक्खू यांच्या ताब्यात द्या..!

0
21

महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार येथे बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने महाबोधी विहार मुक्ती आंदोलन व महाबोधी विहार बौद्ध भिक्खू यांच्या ताब्यात द्या..!

महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत सम्राट अशोक सेनेचे निवेदन सादर…

अकोला, दि.४ मार्च :– बिहार राज्यामध्ये बुद्धगया येथे महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बौद्ध भिक्खूंनी उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन २० ते २५ दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. अनेक भिक्खूंची तब्येत चिंताजनक असतानाही शासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. १९४९ टेम्पल अॅक्ट अधिनियमात तातडीने सुधारणा करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती सोपविण्यात यावे. महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं महत्त्वाचं ठिकाण आहे. याच ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. संपूर्ण विश्वात या ठिकाणाला फार महत्त्व आहे. सदर बुद्ध विहार सम्राट अशोक कालीन आहे. हे बुद्ध विहार गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या ताब्यात आहे. ज्यांचा बौद्ध धम्माशी कसलाही संबंध नाही. महाबोधी महाविहारातून भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश जगभर पसरला पाहिजे यासाठी या बुद्ध विहाराची निर्मिती सम्राट अशोकाने केली होती. परंतु त्याच बुद्धविहारावर आता या ब्राह्मणवाद्यांनी अतिक्रमण करून कब्जा केले. अनेक वर्षापासून हा संघर्ष बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने चालू आहे. आता मोठ्या प्रमाणात जगातील सर्व बौद्ध भिक्खू नी महाबोधी महाविहाराला पाठिंबा दिलेला आहे. महाबोधी महाविहाराचा टेम्पल अॅक्ट १९४९ बदल करावे व हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून घेऊन बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे, या विहारात ज्या ट्रस्टवर पाच ब्राह्मण व चार बौद्ध भिक्षू आहेत. या ट्रस्टवर परिपूर्ण बौद्ध भिक्खू असले पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त त्या बौद्ध विहारात कुठलाही ब्राह्मण हिंदू समाजाचे कोणत्याही व्यक्तीला घेता कामा नाही. जसे कोणत्याही हिंदूंच्या मंदिरात बौद्ध भिक्खू नसतो. कुठल्याही चर्चमध्ये ख्रिश्चन समाजाचा नसतो. मज्जिद मध्ये मुसलमान समाजाच्या व्यतिरिक्त नसतो. गुरुद्वार मध्ये सिख धर्माच्या व्यतिरिक्त नसतो मग बौद्ध विहारात ब्राह्मण कसे..? महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू च्या ताब्यात का नाही..?
श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा १९८३ अॅक्ट आहे. ज्या कायद्यात तरतूद आहे जी व्यक्ती हिंदू नसणार त्यांना मंदिराच्या कोणत्याही समितीत सदस्य होता येणार नाही. येथे कर्मचारी देखील हिंदूच पाहिजे (कलम ३, कलम ६ ( २ ) तरतूद आहे. मग महाबोधी महाविहार समितीत फक्त बौद्धच का नाहीत..? इथं हिंदू ब्राह्मण कसे..? हे सर्व बदललं पाहिजे. बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार परिपूर्ण बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात दिलं पाहिजे. बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध भिक्खू च्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी मागणी सदर निवेदनातून सम्राट अशोक सेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य चे आकाश दादा शिरसाट तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here