देशात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन
घुग्घूस : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या शासनात महिला सुरक्षा धोक्यात आली आहे.
देशात मणिपूर अत्याचाराच्या घटनेच्या जखमा अजून ही ताजे असतांना दररोज महिला अत्याचारच्या घटना घडत आहे.
हरियाणा येथे महिला काँग्रेस नेत्या हिमानी नरवाड यांची क्रूरपणे हत्या करून त्यांचा मृतदेह सुटकेस मध्ये टाकून फेकण्यात आला राज्यात पुणे येथे स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय महिलेवर शिवशाही बस मध्ये दोन वेळा बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली याघटनेवर पांघरून टाकण्यासाठी महायुतीचे नेते महिलेवरच विविध प्रकारचे घाणेरडे आरोप लावत आहे.
केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची सुरक्षा रक्षक सोबत असतांना छेळ काढण्यात आली ज्या राज्यात मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य आई बहिणी कसे सुरक्षित राहील हा अत्यन्त गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशातील तरुणी व महिला यापूर्णपणे असुरक्षित झाले आहेत.
याला पूर्णपणे जवाबदार असलेल्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या निषेधार्थ घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 03 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता निषेध आंदोलन घेण्यात आले.
सदर आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, संध्या मंडल, पूनम कांबळे, वैशाली दुर्योधन,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर,ज्येष्ठ नेते शेखर तंगलापेल्ली, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,शेख शमिउद्दीन,सुनील पाटील, निखिल पुनघंटी,अरविंद चहांदे, अभिषेक सपडी, विजय माटला, रोहित डाकुर,दीपक पेंदोर, मोसीम शेख,बालकिशन कुळसंगे,दीपक कांबळे, अंकुश सपाटे,आयुश आवळे,साहिल आवळे, कपिल गोगला,रंजीत राखुंडे ,सूरज ठावरी,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.