एआयएमआयएमचे मुख्याधिकारी यांना निवेदन…

0
23

एआयएमआयएमचे मुख्याधिकारी यांना निवेदन…

माहे रमजान निमित्त मस्जिद जवळील परिसराच्या स्वच्छतेची मागणी

 

वर्धा / अर्पित वाहाणे
वर्धा एआयएमआयएमचे वर्धा जिल्हा अध्यक्ष सलीम उर्फ सल्लू भाई शेख यांच्या मार्गदर्शनात व शहर अध्यक्ष आसिफ खान यांच्या नेतृत्वात वर्धा नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या पाक माहे रमजान महिना सुरु होत आहे, याच अनुषंगाने मुस्लिम समजाचे प्रार्थना स्थळ असलेलं मस्जिद जवळील परिसराच्या आणि नाल्या स्वच्छतेची मागणी करण्यात आली या सोबतच मस्जिद परिसराच्या मार्गावर असलेले पथदिवे बंद पडलेले आढळुन येथील ते पथ दिवे दुरुस्त करण्यात यावे अशी सुधा मागणी करण्यात आली.
वर्धा शहरातील अनेक मस्जिद परिसराच्या आजु बाजुला केर कचरा बघण्यास मिळतो सोबतच नाल्यांची स्वच्छ्ता योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याचा आरोप आसिफ खान यांनी केला. याच आधारावर माहे रमजान मध्ये तरी नगरपालिका प्रशासनाने मस्जिद परिसराच्या स्वच्छतेची दखल घ्यावी करिता हे निवेदन सादर करण्यात आल्याचे आसिफ खान यांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना जिल्हा अध्यक्ष सलीम उर्फ सल्लू भाई शेख, शहराध्यक्ष आसिफ खान, अथर शेख, शादाब शेख, गुड्डू शेख, अमन शेख, मदर शेख सह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here