राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्वी विधानसभा अजित पवार गट सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात…

0
31

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्वी विधानसभा अजित पवार गट सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात…
विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक सदस्य नोंदणी करून पक्षाची विकासाची विचारधारा तळागळात पोहचविणे हेच ध्येय – दिलीप पोटफोडे

अर्पित वाहाणे
आर्वी, 26 फेब्रु. :– महाशिवरात्रीच्या मंगल पर्वावर शिव मंदिरात जाऊन पूजा अर्चना करून सर्व पदाधिकारी यांनी आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा. ना. अजित दादा पवार यांच्या विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा घराघरात पोहोचविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय सरचिटणीस सुबोधजी मोहिते, वर्धा जिल्हाध्यक्ष शरदजी शहारे यांच्या सूचनेनुसार अरे विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आर्वी तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आर्वी विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचं ध्येय ध्यास घेतला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष तळागळात पोहोचवण्याचा प्रण घेतला असून याची सुरुवात आर्वी तालुक्यातून करण्यात आली. येत्या 2 मार्चला आष्टी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे बैठक घेऊन आष्टी तालुका सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येईल, तसेच 5 मार्चपासून कारंजा शहर व तालुका सदस्य नोंदणी नोंदणीचा प्रारंभ केला जाईल अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.
यावेळी बैठकीला प्रामुख्याने आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर, कामगार जिल्हा उपाध्यक्ष अशपाक शेख, महिला सेल जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे, महिला तालुकाध्यक्षा माधुरी सपकाळ, बरखा शेंडे, सामाजिक आर्वी तालुका अध्यक्ष, मोहनराव खडसे, राजू डोंगरे, कामगार तालुका अध्यक्ष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here