मानव – वन्यजीव संघर्षात चंद्रपूर जिल्हा प्रथम : अमोद गौरकार
एका वर्षात मानव वन्यजीव संघर्षात जिल्हयात 29 मृत्युमुखी
तालुका प्रतिनिधी
चिमूर
चिमूर तालुक्यांतील प्रादेशिक वन विभागाच्या परीसरात वनवणवा प्रतिबंधक उपाययोजना तथा मानव वन्यप्राणी संघर्ष एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.
सदर कार्यक्रमात कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमांचे प्रमूख मार्गदर्शक म्हणून पर्यावरण तरूण मंडळाचे अध्यक्ष अमोद गौरकार, ट्री फाऊंडेशनचे अध्यक्ष मनिष नाईक, चिखलीचे पोलीस पाटील आढाळ, क्षेत्र सहाय्यक उत्तम घुगरे, मेश्राम, औतकर, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यावरण तरुण मंडळाचे अध्यक्ष बोलत होते की, 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एका वर्षात जिल्हयात 29 व्यक्तींनी मानव वन्यजीव संघर्षात आपला जीव गमावला. यात सरपन आणण्यासाठी गेलेले 23, गुरे चारण्यासाठी गेलेले 3, तर बाहेर शौचालयसाठी गेलेले 3 असे एकूण 29 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असे सांगितले. यासाठी दिवसेंदिवस आता रिसोर्टच्या नावाखाली मोठया प्रमाणात जंगलात अतिक्रमण होत आहे. त्यामुळं वन्य प्राणी यांना पाहिजे तसे वावर करण्यासाठीं अडचण निर्माण होतो आहे. त्यामुळं वन्य प्राणी हे जंगलाजवळील लागून असलेल्या गावखेड्यात येत असतात. म्हणुन मानव वन्यजीव संघर्ष घडून येतो आहे. जंगलातील वाघ, रानटी डुक्कर व अस्वल या तीन वन्य प्राण्यांमूळ मानव वन्यजीव संघर्ष जास्त घडून येतो. त्यामुळं जंगल संरक्षित करण्याची जास्त गरज आहे. तरच मानव वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकतो असे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी सांगितले की, आता उन्हाळ्याला सुरवात झालेली आहे. त्यामुळं जंगलात मोहफुल वेचण्यासाठी वनवनवा लावला जातो. मात्र नागरीकांनी असे करु नये. निसर्गसृष्टीचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण केले पाहिजेत. निसर्ग आपला सोबती आहे. निसर्गाचा ऱ्हास म्हणजे जीवनाचा नाश आहे. जंगलात एखादी वनवनवा लागलेला असेल या गस्ती दरम्यान जर एखाद्या व्यक्ती जवळ आग लागणारे कोणतेही वस्तू आढळून आले तर त्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल होत असतात. त्यामुळं जंगलात अश्या कोणत्याही अनुचित घटना घडल्या तर गावातील वनरक्षक किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देवुन आग विझविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करून सांगितले. पुढे म्हणाले की, वन्य प्राण्यांच्या हौदोसामूळ कोणाच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असतील अश्या घटनेचे आपल्याकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. त्या कागदपत्रांची तपासणी करून सर्वांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. त्यामुळं असे कोणतेही प्रकरण माझ्याकडे एकही पेंडिंग नसुन सर्व प्रकरण निकाली काढूण नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाला चिमूर तालुक्यांतील सर्व पोलीस पाटील, तसेच तालुक्यांतील पिआरटी पथक, वन अधिकारी, कर्मचारी, गावातील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्यगण आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यू. बी. लोखंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वनरक्षक कपाळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.