बिबी येथील लाल मिरची जाणार थेट युरोपात

0
29

बिबी येथील लाल मिरची जाणार थेट युरोपात

कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची युरोपियन मानकांनुसार फिट

युरोपात मिरचीला भाव मिळणार असल्याने शेतकरी आनंदीत

 

कोरपना :- युरोपात लाल वाळलेल्य मिरचीला चागलीच मागणी आहे. शिवाय भावही योग्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची आज युरोपात निर्यात करण्यात येणार आहे. युरोपियन मानाकणात चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी येथील लाल मिरची फिट बसली आहे.

कोरपना आणि राजूरा तालुक्यात कापूस, सोयाबीन हे प्रमुख पिके आहेत. त्यासोबतच मिरचीचे उत्पादन घेतले जाते. परंतु पारंपारीक पध्दतीने घेण्यात येणाऱ्या मिरचीला फारसी मागणी नाही. भावही अत्यलप असल्याने शेतकऱ्यांना फारशी आर्थिक् साधता आली नाही. परंतु कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची उत्पादकांना आधुनिक पध्दतीने मिरची पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत त्यांना आर्थीक प्रगतीचा मार्ग गवला आहे. खास करून युरोपीयन मानकांनुसार मिरची पिकांचे उत्पादन घेण्याबाबत कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनात धडे दिले. त्यामुळे पहिल्यांदाच कोरपना तालुक्यात ८५० हेक्टर आणि राजुरा तालुक्यात ३०० एकर मध्ये मिरचीची लागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या मिरची पिकांचे युरोपियन मानकांनूसासर संवर्धन करण्यात करण्यात आले. कृषी तज्ञांनी क्षेत्रीय भेटीने शेतकऱ्यांना मिरची पिकाच्या उत्पादन वाढीस मदत झाली.
कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनात तालुक्यात हानिकारक रसायनांचा वापर कमी करून अवशेष मुक्त (Residue-Free) मिरची उत्पादनाचा प्रायोगिक प्रयोग राबविण्यात आला.

पहिल्याच वर्षी करण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी झालेल्या ४ शेतकऱ्यांची मिरची युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत बेंगलोर येथे करण्यात करण्यात आलेल्या परीक्षणात उत्तीर्ण ठरली आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून बिबी येथील स्वप्नील झुरमुरे, चंद्रकांत पिंपळकर व दिनकर डाहुले यांची मिरची उत्पादनाने युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत यशस्वीरित्या प्रवेश मिळवला आहे.लवकरच चंद्रपर जिल्ह्यातील लाल मिरची जागतिक बाजारपेठे उपलब्ध होणार आहे. राजुरा व कोरपना तालुक्यातील लाल मिरची युरोपात विक्रीसाठी निर्यात केली जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्यास्थितीत लाल मिरचीला फारसा भाव नाही. युरोपात मात्र लाल मिरचीचा चांगला भाव आहे. युरोपीयन बाजारपेठेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असल्याने ने मिरची उत्पादक यावेळी आनंदीत दिसून येत आहे. कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नामुळे जागतिक बाजारपेठेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची उत्पादक पोहचला असल्याची दखल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतली. कोरपना तालुक्यातील बिबी या गावचे मिरची उत्पादक स्वप्निल झुरमुरे व चंद्रकांत पिंपळकर यांचा सन्मान केला.

कृषी स्वराज्य कंपनी वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यामुळे आज आमची लाल मिरची युरोपात पाठवू शकलो आत्तापर्यंत १८ क्विंटल विक्रीला गेली आहे. यामुळे आम्ही समाधानी आहे. – स्वप्नील झुरमुरे, मिरची उत्पादक शेतकरी बीबी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here