शेकडो कार्यकर्त्यांसह वरूर चे सरपंच गणपत पंधरे भाजपात…
आमदार देवराव भोंगळे यांचे उपस्थित पक्षप्रवेश
राजुरा, दि. २१ :- राजुरा तालुक्यातील वरूर (रोड) चे सरपंच तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. गणपत पंधरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
वरूर येथे काल (दि. २०) भाजपा वरूर शाखा तथा गुरूदेव सेवा महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमावेळी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी प्रदिप डहाके, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, रविंद्र ठाकुर, महामंत्री सचिन बल्की, उपसरपंच विजेता करमनकर, बंडू भोंगळे, दिनकर धानोरकर, विलास वडस्कर, नागेश भोंगळे, मिना डहाके, बेबी धानोरकर, सुरेखा बोरकुटे, सुरेखा जानवे, गणेश करमनकर, सुरेश वैरागडे, राकेश लांडे, घनश्याम पिंपळशेंडे, राजु धानोरकर आदिंसह वरूर वासीयांची मोठी उपस्थिती होती.