छत्रपती शिवाजी महाराज शौर्य, पराक्रम व स्वाभिमानाचे प्रतीक : विवेक बोढे
मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंतीनिमित्त अभिवादन
घुग्घुस: येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बुधवार, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम व स्वाभिमानाचे प्रतीक होते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मशाल पेटवून अन्यायाविरुद्ध उभे राहिले. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी मुघल साम्राज्याला हादरवून सोडले.
यावेळी भाजपाचे साजन गोहने, सुनील बाम, चिन्नाजी नलभोगा, तुलसीदास ढवस, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, इर्शाद कुरेशी, अनिल मंत्रिवार प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, वंदना मुळेवार, सविता बोढे, निशा उरकुडे, सुनीता पाटील, प्रीती धोटे, सुनंदा लिहीतकर, सुनील राम, असगर खान, हेमंत कुमार, मारोती मांढरे, गणेश राजूरकर, उमेश दडमल, पियुष भोंगळे, मधुकर धांडे, भारत साळवे व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.