श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षा तर्फे आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने राहुल संपत पवार यांच्या वार्ड मध्ये १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यात सर्व लहान मुलांनी भाग घेतला होता.
सर्व स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली व तीन उत्कृष्ट स्पर्धकांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली. बाल शिवाजी दिवित केळशीकर बनले होते. लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले, तसेच शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले, या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम साहेब यांनी ही भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मौल्याचे सहकार्य प्रमोद सावंत, बाळा हरेरे, स्वराज्य गृहनिर्माण सोसायटी चे स्थानिक रहिवासी व राकेश रमेश सोडये- मुंबई सचिव/ प्रशासक, प्रथमेश शिंदे- माहीम ता. अध्यक्ष वार्ड क्रमांक १९२, राज फासे, श्री. कृष्ण पिठला व अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.