सेनापती बापट मार्ग येथील “जेष्ठ नागरिक ग्रुप” कडून “उद्यान बचाव आंदोलन
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ३० वा “स्व प्रमोद महाजन कला पार्क” सेनापती बापट मार्ग येथील “जेष्ठ नागरिक ग्रुप” कडून “उद्यान बचाव आंदोलन” केले. गेल्या २ वर्षांपासून उद्यानातील विविध नागरिक सुविधाचा अनिशितात आहे. वेळोवेळी मागणी पत्र पाठपुरावा करून सुद्धा सदर प्रश्न मार्गी लागला नाही. भेडसवणाऱ्या समस्येनी आंदोलनाची स्वरूप प्राप्त केले. स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या नेतृत्वात अवघ्या उद्यान प्रेमिनी उत्स्फूर्त सहभागी होऊन आंदोलनात नागरिकांच्या पाठिंबा देऊन सहभागी झालो. यासामयी स्थानिक दादर पोलीस ठाणे चे अधिकारी येऊन जेष्ठ नागरिकांचे प्रश्न समजून लवकरच मनपा अधिकारी सोबत बैठक लावून प्रश्न लवकर मार्गी लावला जाईल असे सांगितले.
सेनापती बापट मार्ग येथील स्वर्गीय प्रमोद महाजन कला पार्कातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. दादर सेनापती बापट मार्ग येथील स्वर्गीय प्रमोद महाजन कलम पार्क येथे मोठ्या प्रमाणात सकाळ पासून सायंकाळ पर्यंत अनेक नागरिक जॉगर्स करिता खेळण्याकरिता लहान मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात. निसर्गरम्य अशा महानगरपालिकेच्या सदर कला पार्कातील नागरिकांसाठी महापालिकेकडून खालील सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
१) स्वर्गीय प्रमोद महाजन कला पार्कात पूर्णतः बंद असलेले विद्युत दिवे दुरुस्त करणे.
२) पावसाच्या पाण्याचा निजरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यांवर उद्यान पुर्ववत करणे.
३) स्त्री-पुरुषांसाठी उपलब्ध असलेल्या प्रसाधनगृहातील बंद असलेले विद्युत दिवे दुरुस्त करणे.
४) योगा वर्ग करण्यासाठी असलेल्या जागेच्या भिंतीचे प्लास्टर करून रंग रंगोटी करणे.
५) नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टाकी बसविणे.
६) पार्कातील नष्ट झालेल्या रस्त्याची पूर्ण निर्मिती करणे.
७) पार्कात येणाऱ्या तरुण वर्गांसाठी ओपन जिमची निर्मिती करणे.
८) मुलांसाठी खेळासाठी खेळणी बसविणे. अशा विविध संदर्भात लोकांनी मागणी व दखल घेण्याची विनंती आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर व महानगर पालिका यांच्याकडे सह्या करून दिले आहे. अशी माहिती श्री. जितेंद्र कांबळे. (एस ई ओ व भाजपा वडाळा विधानसभा उपाध्यक्ष) यांनी दिली आहे.