नकोडा येथे आ. जोरगेवार यांच्या पुढाकारातून नारी शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
नकोडा येथील दि. १४ फेब्रुवारी २०२५ शुक्रवार रोज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा गाडगेबाबा सभागृहात आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात उत्सव नारी शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
‘उत्सव नारी शक्तीचा’ भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आणि नकोडा गावकऱ्यांच्या वतीने आयोजित “उत्सव नारी शक्तीचा” सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सर्वप्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेस व सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री आणि स्त्रीवादी होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. यांच्या प्रतिमेस आ. किशोर जोरगेवार यांनी द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ. किशोर जोरगेवार, अध्यक्ष नामदेव डाऊले प्रमुख पाहुणे दुर्गाताई बावणे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या समर्पित कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. महिलांच्या सामर्थ्याला आणि त्यांच्या संघर्षांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी महिलांच्या सशक्तीकरणावर बल देत त्यांच्या गौरवले. महिलांचा उत्साह आणि योगदान हे समाजासाठी प्रेरणादायक आहे.
तसेच महिलांनी सांस्कृतिक एकल व समुह नृत्य सादर करण्यात आले बघण्यासाठी महिलेची अलोट गर्दी होती.
याप्रसंगी यंग चांदा बिग्रेड व भाजप नेते इमरान खान, ग्रामपंचायत सदस्या (नकोडा) सौ.ममता मोरे, शितल तोटा, रंजनाताई झाडे, राणी पोल, शोभा रंगारी, पुष्पांजली काटकर, सारिका मोरे, सुषमा गुरनुले, राजमनी दुर्गा आकुलवार, दिपाली गड्डम, रंजना नवलं, वनिता निहाल, सुरेखा तोडास, अनिता गोवर्धन, ज्योती बावरे, भारती सौदारी सादिक शेख, पराग आकुलवार, शेख निरज मेश्राम, सिद्धार्थ करमणकर, बिट्टू झाडे, राजु पोल, शाहरुख शेख, अरमान शेख व परिसरातील गावा-गावातील महिला उपस्थित होते.