आगरगाव तांडा येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत
मार्शल अर्पित वाहाणे
वर्धा आगरगाव (तांडा) : देवळी तालुक्यातील फासे पारधी बहुऊद्देशीय वाचनालयात गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक व विहार तेथे वाचनालय या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची ग्राम शाखा गठीत करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी फासे पारधी बहुऊद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अचिन पवार, रोशन दाभाडे हे उपस्थित होते.
सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले व त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे अध्यक्षतेखाली समता सैनिक दल आगरगाव ग्राम शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
त्यामध्ये ग्राम शाखा संघटकपदी मार्शल अजित पवार,सह-संघटकदी मार्शल अमित पवार ,बौध्दिक प्रमुख आचिन पवार तर शाखा निमंत्रक म्हणून मार्शल विकेंद्र काळे,शाखा-प्रचारक मार्शल मनिष चौव्हान,शाखा कोषप्रमुख विशाल पवार,शाखा सुरक्षा प्रमुखपदी आकाश पवार,सह सुरक्षापदी मंगेश काळे, ऋतिक काळे यांची निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून निर्जुना काळे,अमेशा भोसले, रोशन भोसले, शुभम काळे,चतुरसिंग पवार,लक्ष्मण पवार,निलेश भोसले, जय काळे, बादल पवार वैशाली पवार,नेहा पवार,अमिता पवार, आमिता भोसले,सुजूका चौव्हान,प्रतीक्षा चौव्हान, पल्लवी चव्हान यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालनआकाश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार अचिन पवार यांनी मानले.कार्यक्रमाचा शेवट समापन गाथेने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.