चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंट विटाचा ट्रक पलटी
दोन जण गंभीर जखमी तर एक मजूर किरकोळ जखमी : अडेगाव देश फाटयावरील घटना
पोलीस विभागाच्या समयसूचकतेने वाचले दोघांचे जीव
चिमूर/तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील अडेगावं देश रस्तावरील पुलाला लागून असलेल्या रस्त्यावर आज दुपारी २ वाजताच्या दरम्यान ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात चालक व क्लिनर बचावले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने सुटकेचा निश्वास घेण्यात आला.
याबाबत असे की,आज दिनांक २५ जानेवारीला वरोरा येथून एका खाजगी रिसार्ट वर सिमेंटच्या विटाने भरलेला ट्रक क्रमांक एमएच ३४- एबि ४३३५ हा खाजगी रिसर्ट वर विटा खाली करून वरोरा येथे जात होता.
भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव जाणारा ट्रक रस्ताच्या कडेला शेतात उलटला. यात ट्रक चालक नाव खुशाल साळवे वरोरा, तर जखमी मजुराचे नामें मुन्ना दशमा (मध्यप्रदेश )तेज दशमा (मध्यप्रदेश )हे जखमी झाले आहे. विहीरगाव येथील वाघाच्या हल्यात बंदोबस्त साठी आलेल्या पोलीस विभागाला याची माहिती मिळताच तात्काळ घटना स्थळी दाखल होत, एका तासाच्या पोलिसाच्या अथक परिश्रमा नंतर जेसीबी द्वारे ट्रक ला वर उचलून दबून असलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यास पोलीस विभागाला यश आले. या दोघांनाही उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे दाखल केले आहे.
यात पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती मरकाम यांनी स्वतः जखमीला बाहेर काडून मोठे सहकार्य केले या वेळी चिमूर पोलीस विभागातील कर्मचारी व गावकरी यांनी मदत केली.