संघरामगिरीत होणार धम्मतत्त्वावर विचारमंथन

0
55

संघरामगिरीत होणार धम्मतत्त्वावर विचारमंथन

अखिल भारतीय भिख्खूसंघ व खा. चंद्रशेखर आझाद यांची राहणार उपस्थिती

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर
तपोवन बुद्धविहार,महाप्रज्ञा साधनाभुमी संघारामगिरी येथे दि.२३जानेवारी पासून सतीपठाण कार्यक्रम सुरू असून दि.३० व ३१ जानेवारीला दोन दिवसीय धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.समारोहासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केल्या जात आहे.

अध्यक्ष स्थानी वर्धा जिल्ह्यातील तपोभूमी आंबोडा येथील महस्थाविर भदंत शिलानंद तर प्रमुख अतिथी म्हणून आझाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांची विशेष उपस्थिती असणार आहे.विशेष अतिथी म्हणून देश विदेशातील अनेख भिख्खू उपस्थित असणार आहेत.

मुख्य समारंभाची सुरुवात दि.३० ला. सकाळी.१०.०० ला ध्वजारोहनाने होईल. शिलग्रहन सकाळी११.०० वाजता, भिख्खू संघाचे भोजनदन व धम्म तत्वज्ञानावर प्रवचन होणार आहे. सायं.४.०० वाजता खासदार चंद्रशेखर आझाद यांचे आगमन व मार्गदर्शन रात्री ९.००वा बुद्ध रंगभूमी तर्फे मुक्तनाटक व नंतर महापरित्रंपाठ होणार आहे. दि.३१ ला पहाटे ५.००ते.६.३०वाजता ध्यान साधना व मंगलमैत्री,सकाळी९.००ते ११.०० पर्यंत प्रतीत्यसमूतत्पाद व पट्टानपली विषयावर प्रवचन, भिख्खू संघाला चीवर व अस्टपरिस्कर दान आदी कार्यक्रम होतील. डा.बाबासाहेब आंबेडकर व चळवळ ,महापरिनिर्वाण आदी विषयांवर तज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत.मंगलमैत्री ने समारोप होणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन भिखू संघाचे संघनायक महास्थविर भदंत द्यानज्योती करणार असून या कार्यक्रमाचं लाभ घेण्याचे आवाहन डा.भंते धम्मचेती यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here