वाघाच्या हल्यात विहीरगाव येथील गुराखी ठार…

0
43

वाघाच्या हल्यात विहीरगाव येथील गुराखी ठार…

 

आशिष गजभिये
चिमूर

तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात विहीरगाव येथील गुराख्याला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक २५ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे आहे की विहीरगाव येथील पाच ते सहा लोकांची गावातील जनावरे चारण्याची एका हप्त्याची पाळी होती.आज त्यांच्या पाळीचा दुसरा दिवस जनावरे नेण्याचा होता.भाऊराव नागोसे,अनिल जांभळे,जानिक धाडसे, यांच्या सोबत गुरे घेऊन सकाळी दहा वाजता सहकारी गुराखी सोबत गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने जंगलातच गुरख्याला ठार मारले. सदर गुराखी दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) रा. विहीरगाव (ता.चिमूर ) असे मृत गुराख्याचे नाव आहे.
सोबत असलेल्या सहकारी गुराखी सोबत काही अंतरवार जनावरे चारीत असताना अचानक वाघाने हल्ला करून गुराखी दयाराम गोंडाने याला तोंडात उचलून दाट जंगलात घेऊन गेला सोबत असलेल्या सहकारी यांनी आरडा ओरड केली मात्र वाघाने त्याला सोडले नाहीं. तेव्हा सहकारी गुराखी यांनी गावात मोबाईल द्वारे सदर घटनेची माहिती दिली नंतर गावातील नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत हल्ल्यात मृतक गुरख्याचा.शोध कार्य राबविले असता पुढे काही अंतरावर शोध घेतला असता त्यांच्या मृतदेहच मिळाला असता त्याचे मानेवर घाव आढळून आले.
. सदर परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक जनावरांचा फडशा त्याने पाडला. काही लोकांना या वाघाचे दर्शनही झाल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्याचे प्रेत उचलून शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. या वेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्रम,अमोल कवासे वनपाल,वनपाल विनोद किलनाके,निखूरे,वनरक्षक नागलोत, मेश्राम, खारडे,जिवतोडे, जरारे, गेडाम,दुधे, ठाकरे, पोलीस निरीक्षक सतोष बाकल सह पोलीस कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी हजर होते.मृत्यकाच्या कुटुंबास वनविभागाच्या पन्नास हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here