जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने सुब्बईत रक्तदान शिबीराचे आयोजन
आमदार देवराव भोंगळे यांचेकडून भ्रमणध्वनी हून शिबिरास शुभेच्छा…
राजुरा, दि. १३
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पीठ नानीजधाम च्या वतीने दरवर्षी ‘रक्तदान महायज्ञ’ ही संकल्पना राबविली जाते, त्याच धर्तीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही (दि. ११) राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७९ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्दान करून राष्ट्रकार्यात आपले योगदान दिले.
याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांनी रक्तदान शिबिराला भ्रमणध्वनीहून सदिच्छा दिल्या. पक्षीय बैठकीच्या निमित्याने शिर्डी येथे आलो असल्याने मी याठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही . परंतु रक्त्दानासारखे पुण्य नाही. आपल्या रक्ताच्या थेंबामुळे कुणाचे तरी प्राण वाचतील हे समाधान अमुल्य असेच आहे. त्यामुळे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने चालविलेल्या या ‘रक्तदान महायज्ञ’ संकल्पनेस माझ्या शुभेच्छा असे आमदार भोंगळे म्हणाले.
या कार्यक्रमाला सरपंचा ग्रा. पं. दर्शना जाणवे, सुरेखा सुधाकर आत्राम, अविनाश जाधव, रामलुजी जाधव, पुष्पा आत्राम, सचिन बल्की, विनायक धनवलकर, किशोर पिंपळकर, सुधाकर बुटले, नथ्थुजी बोबाटे, दशरथ तन्नीरवार, निखील अमर, सुनील बोबाटे यांचेसह नरेंद्राचार्य महाराज कमिटीचे पदाधिकारी, रक्तदाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.