काँग्रेस कमिटीतर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमात कंबल व खाद्यपदार्थ वितरण
घुग्घूस : – चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्त आज दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी नवी दिशा वृद्धाश्रम घुग्घूस येथे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कंबल व खाद्यपदार्थ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अनिल नरुले व राजुरेड्डी यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुषांना थंडी पासून बचाव करण्यासाठी मऊ व ऊबदार कंबलचे वाटप करण्यात आले सोबतच त्याच्या खाण्यासाठी तोस, बिस्कीट, चिवडा, चिप्स असे खाद्य पदार्थ वितरित करण्यात आले.
यासोबतच वृद्धाश्रमातील माता – पित्याच्या हस्ते केक कापून खासदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या दीर्घायुष्य करीता प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,तालुका तालुका सचिव विशाल मादर,मोसीम शेख,तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,शेखर तंगलापेल्ली, एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका, शेणगाव अध्यक्ष भास्कर सोनेकर, रोहित डाकूर,सुनील पाटील,दिपक पेंदोर, निखील पुनघंटी, दिपक कांबळे,कुमार रुद्रारप,कपिल गोगला, अनवर सिद्दीकी,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.