सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींची मेजवानी
घुग्घुस दि.४ जानेवारी २०२५ शनिवार रोजी
श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,घुग्गुस त.जि.चंद्रपूर येथे दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव अति उत्साहात पार पडला.
सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य अनु खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली ए.सी.सी. (अदानी फाउंडेशन) चे सी.एस.आर व्यवस्थापकअक्षय पतंगे,लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे सी.एस.आर व्यवस्थापक दीपक साळवे, परिसरातील लोकप्रिय समाजसेवक राजूभाऊ रेड्डी, ब्रिजभूषण पाझारे, सय्यद अन्वर , दिलीप पिटलवार,अलीम शेख, फाल्गुन खमनकर मुकेश भोयर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थिनींनी नृत्यनाट्य,एकांकिका , कविता वाचन,कथाकथन व विविध कृतीतून विद्यार्थिनींनी व प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
समारोपीय कार्यक्रमात नम्रपाली गोंडाने सी.एस.आर. विभाग, प्राचार्य अनू खानझोडे यांचे अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रकाश सातार्डे यांनी तर आभार सुधीर डांगे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.वैशाली जोशी , उमादेवी लाटकरी प्रा.माधव वनकर, गणेश मत्ते,बालाजी लेडांगे, विद्यार्थिनींनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.