कष्टकरी कामगारांचे योगदान देश आणि उद्योगाच्या प्रगतीचा पाया – आ. किशोर जोरगेवार

0
74

कष्टकरी कामगारांचे योगदान देश आणि उद्योगाच्या प्रगतीचा पाया – आ. किशोर जोरगेवार

श्रमाचा सन्मान करत एमईएल येथील कामगारांसोबत नववर्षाचे स्वागत

कामगार समाजाचा खरा कणा आहेत. आपले कष्ट, आपले घामाचे थेंब आणि आपली निष्ठा यामुळेच आपल्या उद्योगांची भरभराट होत असून समाज प्रगतिपथावर वाटचाल करत आहे. कोणत्याही क्षेत्राचा विकास कामगारांच्या श्रमाशिवाय शक्य नाही. देशाच्या विकासात, उद्योगांच्या प्रगतीत कष्टकरी कामगारांचे योगदान महत्त्वाचे असून हाच प्रगतीचा पाया असून आपल्या श्रमाचा सन्मान करण्याच्या उद्देशातून आपण नववर्षाची सुरुवात आपल्यासोबत करत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांनी कष्टकरी वर्गासोबत नववर्षाची सुरुवात केली. यंदा त्यांनी मुल रोड वरील एम.ई.एल येथे जात येथील कामगारांसह नववर्ष साजरा केला. यावेळी एम.ई.एल चे महासंचालक वंदना देशमुख, कार्यकारी संचालक संजय कुमार गजभिये, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक बी. विश्वनाथ, कामगार विभागाचे महाव्यवस्थापक आर.डी. गायकवाड, तांत्रिक सहाय्यक विभागाचे सहाय्यक महासंचालक अजय कुमार, भारतीय जनता पार्टीचे बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, दशरथ सिंग ठाकुर, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, महामंत्री प्रलय सरकार, माजी नगर सेविका चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, रिव गुरनुले, वैद्यकिय घाडीचे अध्यक्ष डाॅ. गिरिधर येडे, अनिल सुरपाम, नरेंद्र बोपचे, नरेश बचले, सुरेश जांभुळकर, अॅड. सुरेश तालेवार, वंदना हातगावकर, विमल कातकर, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, चंद्रशेखर देशमुख, नीलिमा वनकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कामगार वर्ग नेहमी दुर्लक्षित राहिला आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यापासून या क्षेत्राला न्याय देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. आपण कर्तव्यावर असताना आपल्याला सुरक्षा साधने मिळाली पाहिजेत, वेतनासह सन्मान मिळाला पाहिजे यासाठी आपण वेळोवेळी योग्य भूमिका घेतल्या आहेत. कष्टाचा सन्मान करण्यासाठी आपण दरवर्षी कामगार वर्गासोबत नववर्षाची सुरुवात करतो. येथे आल्यावर वर्षभर जनतेसाठी काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.
आजचा दिवस केवळ कॅलेंडरवरची तारीख बदलणारा दिवस नाही, तर आपल्यासाठी नवीन संधी, नव्या दिशा आणि नव्या उमेदीनं पुढे जाण्याचा निर्धार करणारा दिवस आहे. आपण सर्वजण मेहनती, प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करून हा उद्योग आणि आपले कुटुंब प्रगतीच्या दिशेने पुढे नेत आहात.
कामगारांच्या आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षितता यासाठी शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचे आपले प्रयत्न राहिले आहेत. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या डोळ्यांमधील चमक आणि मेहनतीच्या बळावर पुढे जाण्याची जिद्द पाहून देशाच्या उज्वल भविष्याची आशा वाटते. कष्टकरी माणूस हा समाजाचा खरा हिरा असतो. त्याच्या घामातूनच देशाचा विकास घडतो. या नववर्षात आपण सर्वांनी एकत्र येऊन नव्या संकल्पांवर काम करायचे आहे. प्रगती आणि विकासाच्या वाटेवर वाटचाल करताना एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांसह अल्पोपहार घेत त्यांना अम्मा टिफिन भेट स्वरूपात देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यापूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी भूमिगत खाणीत जाऊन तेथील कामगारांसह नववर्ष साजरा केला होता. तर सफाई कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसहही आमदार किशोर जोरगेवार यांनी यापूर्वी नववर्ष साजरा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here