घुग्घुस येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न
घुग्घुस येथील श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित ३० ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी २ दिवस मानवतेच्या महान पुजारी संत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला.
पुण्यतिथी महोत्सव २ दिवसांपासून आयोजन करण्यात आले.तसेच अनेक वर्षांपासून दर महिण्याच्या एका आटवड्यात एक दिवसाला ग्राम सफाई अभियान श्री.सत्यशिव गुरुदेव मंडळ व जेष्ठ नागरिक यांच्या नेतृत्वात होत आहे.
३१ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घुग्घुस शहरात श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पालखी सोहळा काढण्यात आले.तसेच सर्व धर्मीय पक्षातील नेते प्रबोधन कार्यक्रम व पालखी रॅली मध्ये आवर्जून उपस्थित होते.
सांयकाळी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आले.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मधुकर मालेकर,कोषाध्यक्ष नारायणराव ठेंगणे,उपाध्यक्ष सुरेश बोबडे,सचिव संजय भोंगळे, संस्थापक सचिव नीलकंठ नांदे संघटक पंढरी कातारकर,सतीश बोंढे,दिलीप खांडेकर,राजू काळे,गौरव चौधरी,महीफाल कांबळे, विनोद सातघरे,मंगेश ठाकरे,राहुल ठाकरे, चेतन जेऊरकर,शुभम जेऊरकर,दिपक पेंदोर,राहुल ठाकरे,वेदांत पायघन,रितेश कांबळे,दिपक खुटेमाटे,सामाजिक महिला कार्यकर्ते सौ.नितुताई चौधरी,वैशालीताई ढवस,सेरेखा डाखरे,चंदा गेडाम तसेच जेष्ठ नागरिक व परिसरातील सहभागी उपस्थित होते.