लाॅईड्स इन्फिनिट फाउंडेशन यांचे वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
लाॅयड्स मेटल अँन्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस पुरस्कृत
रुग्णवाहिका जीवनाचा रक्षक, वेळेचा देवदूत!
लाॅयड्स मेटल अँन्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लॉयड्स इन्फिनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात,शेतीविषक उपक्रम शैक्षणिक,महिला बचत गट उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे,याच माध्यमातून सामाजिक दायित्व विभागांतर्गत समुदाय सेवेसाठी २ रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा दि
२६ डिसेंबर २०२४ गुरुवार रोजी आयोजित करण्यात आले होते.
स्थानिक समुदायांना सेवा देण्यासाठी हा एक महत्त्वाचा पाऊल आहे ज्यामध्ये फाउंडेशन तर्फे रुग्णवाहिका प्रकार B आणि C च्या दोन पूर्णपणे सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्धता करण्यात आल्या आहे.जे आवश्यक वैद्यकीय वाहतुक आणि आत्मकालिण सेवा प्रदान करण्यासाठी उपलब्ध आहे.
या रुग्णवाहिका, फाउंडेशन आपत्कालीन वैद्यकीय सेवांमधील अंतर भरून काढण्याच्या प्रयत्न करत आहे.जेणेकरून गरज असलेल्या व्यक्तींना वेळेत मदत मिळु शकेल.हा उपक्रम फाउंडेशनच्या टिकाऊआहे विकासाच्या मिशनशी सुसंगत आहे आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या उद्देश आहे.आणि समुदायाची सेवा करण्यासाठी तयार असतील, जेणेकरून मदतीसाठी नेहमीच एक कॉल दुर असतील.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.श्री.जेनिथ चंद्रा (IAS) उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी उपस्थित होते,तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.महादेव चिंचोळे (जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर),मा.श्री.अतुल कठारे ( जिल्हा वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर),मा.श्री.जितेंद्र गादेवार नायब तहसीलदार चंद्रपूर,मा.श्री.वाय.जी.एस.प्रसाद युनिट हेड लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड, मा.श्री.प्रशांत पुरी वरीष्ठ उपाध्यक्ष, मा.श्री.पवन मेश्राम उपाध्यक्ष, श्री.तरुण केशवाणी, श्री.दिपक साळवे,उसगांव, म्हातारदेवी,शेनगाव,सोनेगाव,मुरसा, पांढरकवडा,धानोरा,पिपरी,नकोडा, वढा येथील सरपंच,उपसरपंच,आशा वर्कर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मा.श्री.प्रशांत पुरी यांनी प्रास्ताविक केले रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि आम्ही कंपनी अंतर्गत रुग्णवाहिका मार्फत रुग्णांची सेवा करु आणि समाज विकासासाठी नेहमी कार्य करु असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.श्री.जेनिथ चंद्रा यांनी लॉयड्स मेटल अँन्ड एनर्जी लिमिटेड आणि लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित केले आहे.त्याबद्दल म्हनापासुन आभार मानले आणि समाजसेवेच्या दिशेने अतिशय चांगला उपक्रम राबवित आहे,असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनुराग मत्ते यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वेसाठी संस्कार चोरघे, अरविंद चौधरी, रमन पानपटे, लता बावबे, अश्विनी खोब्रागडे,प्रिया पिंपळकर, मंजुषा वडस्कर, मनिषा बरडे, ममता मोरे यांनी सहकार्य केले.