वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या लाळुबाई आत्राम यांच्या कुटुंबीयांची आमदार देवराव भोंगळे यांनी घेतली सांत्वनपर भेट…
प्रतिनिधी/अविनाश रामटेके
विरुर स्टेशन/राजुरा, २४ डिसेंबर :- विरूर स्टेशन वनपरिक्षेत्र हद्दीतील कविटपेठ येथील शेतकरी महिला आपल्या शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवत काल सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास जागीच ठार केले. दरम्यान राजुरा चे आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने रात्री १० वाजता मृतक लाळूबाई आत्राम यांच्या कविटपेठ येथील राहत्या घरी सांत्वनपर भेट दिली.
लाळूबाई आत्राम या वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केला आहे. या दरम्यान आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. शासनातर्फे मिळणार असणारी आर्थिक मदत लवकर मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
काल (दि. २३) सायंकाळच्या सुमारास विरूर स्टेशन वनपरीक्षेत्रातील कविटपेठ येथील लाळुबाई अर्जुन आत्राम वय 60 वर्ष यांचेवर शेतात काम करीत असतांना नरभक्षी वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची दुर्घटना घडली; या घटनेनंतर कविटपेठ येथे आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन आत्राम कुटुंबीयांचे सांत्वन केले.
ही दुर्घटना अतिशय दुःखद असून धक्कादायक अशीच आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा केली. भयग्रस्त नागरीकांच्या समस्या ऐकून घेत या नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना लागलीच केली.
यावेळी भाजपचे तालुका महामंत्री बाळनाथ वडस्कर, तालुका उपाध्यक्ष सतिश कोमरवेल्लीवार व तालुका सचिव प्रदीप पाला, शंकर धनवलकर, सत्यपाल दुर्गे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.